दोन वेगवेगळ्या अपघातांत दाेन जण ठार; दहिवेल आणि शिंदखेडाजवळील घटना

By देवेंद्र पाठक | Published: April 27, 2023 07:13 PM2023-04-27T19:13:18+5:302023-04-27T19:13:22+5:30

दुचाकीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली

Two dead in two separate accidents in dhule; Incidents near Dahivel and Shindkheda | दोन वेगवेगळ्या अपघातांत दाेन जण ठार; दहिवेल आणि शिंदखेडाजवळील घटना

दोन वेगवेगळ्या अपघातांत दाेन जण ठार; दहिवेल आणि शिंदखेडाजवळील घटना

googlenewsNext

धुळे - साक्री तालुक्यातील दहिवेल शिवार आणि शिंदखेडानजीक झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दाेन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत अपघाताची नोंद करण्यात आली.

साक्री तालुक्यातील घटना
साक्री तालुक्यातील दहिवेल ते सातारपाडा रस्त्यावरील फाट्यावर एमएच १८ बीव्ही ३०५४ क्रमांकाची दुचाकी आणि जीजे १५ डीई ६३३० क्रमांकाची दुचाकी यात अपघात घडला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात निंबा गबा पवार (वय ४५, रा. सातारपाडा, ता. साक्री) हे रस्त्यावर फेकले गेले. त्यांना डोक्याला आणि शरीराच्या अन्य ठिकाणी गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव घटनेचा तपास करीत आहेत.

शिंदखेडाजवळील घटना
शिंदखेडा शहरापासून ३ किमी अंतरावर पहिल्या फरशीजवळ एमएच १८ बीपी ४६६१ क्रमांकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली. अपघाताची ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेनंतर (वेळ निश्चित माहिती नाही.) या अपघातात कृष्णा भिका भिल (वय २६, रा. दोंडाईचा) या तरुणाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेताना मृत्यू झाला. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात बुधवारी दुपारी १ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस उपनिरीक्षक ठाकरे घटनेचा तपास करत आहेत.

Web Title: Two dead in two separate accidents in dhule; Incidents near Dahivel and Shindkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.