तार चोरीप्रकरणी कंपनीच्या दोन कर्मचा:यांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: June 10, 2017 04:08 PM2017-06-10T16:08:41+5:302017-06-10T16:08:41+5:30
कंपनीचे सुरक्षा रक्षक रामनिवास क्षेत्रपाल यादव यांनी निजामपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
ऑनलाईन लोकमत
निजामपूर, जि. धुळे, दि. 10 - साक्री तालुक्यातील शिवाजी नगरच्या सोलर कंपनीच्या प्रकल्पातून 320 मीटर तांब्याची 70 हजार रुपये किंमतीची तार चोरून नेल्याप्रकरणी कंपनीतील दोन संशयित कर्मचा:यांवर निजामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून एकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
कंपनीचे सुरक्षा रक्षक रामनिवास क्षेत्रपाल यादव यांनी निजामपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. टॉवर क्रमांक दोन जवळून तांब्याची 320 मीटर वायर चोरीला गेली आहे. ही तार कंपनीत कामावर असलेल्या भटू काशीनाथ थोरात (वाघापूर, ता. साक्री), सुकदेव नमाजी गर्दे (नागपूर, ता. साक्री) यांनी नेली असल्याची माहिती काही कर्मचा:यांनी दिली. त्यानंतर त्यांच्या विरोधात भादंवि कलम 381 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.