चितोड गावात दोन गटात तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:48 AM2018-02-14T11:48:46+5:302018-02-14T11:49:34+5:30

निवडणुकीच्या वादाचे पडसाद : २८ जणांविरुध्द गुन्हा 

Two groups in Chitod village are thunderous clashes | चितोड गावात दोन गटात तुंबळ हाणामारी

चितोड गावात दोन गटात तुंबळ हाणामारी

Next
ठळक मुद्देचितोड गावात उमटले निवडणुकीचे पडसाददोन गट समोरा-समोर आल्याने तणावपरस्पर विरोधी फिर्याद, २८ जणांविरुध्द गुन्हा 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : निवडणुकीच्या वादाचे पडसाद धुळे तालुक्यातील चितोड गावात उमटले़ क्षुल्लक कारणावरुन दोन गट दुपारी परस्पर भिडले़ दगड, विटांचा वापर झाल्याने तणाव निर्माण झाला होता़ धुळे तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद रात्री नोंदविण्यात आली़ 
धुळे तालुक्यातील चितोड येथे राहणारे रमेश किसन गवळी (दहिहंडे) यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार भिमा लक्ष्मण उदीकर, अर्जुन लक्ष्मण उदीकर, अंबादास लक्ष्मण उदीकर, विनोद गोविंद उदीकर, काशिनाथ गोविंद उदीकर, सौरव अर्जुन उदीकर, संजय भिमा उदीकर, अजय भिमा हौसीकर, अशोक संभाजी भैरवाडे, निखील अशोक भैरवाडे (सर्व रा़ चितोड ता़ धुळे) या संशयितांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३३७, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला़ 
दुसºया गटातील कल्पना भिमा उदीकर या महिलेने फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, बंडू किसन दहिहंडे, अतुल बंडू दहिहंडे, चैताली बंडू दहिहंडे, संगिता बंडू दहिहंडे, रामाआप्पा सदा दहिहंडे, पाराआप्पा रामा दहिहंडे, संदिप रामा दहिहंडे, सागर मधुकर दहिहंडे, किसन मधुकर दहिहंडे, रमेश किसन दहिहंडे, आशा रमेश दहिहंडे, अनिताबाई रामाआप्पा दहिहंडे, रुपाली राजेंद्र दहिहंडे, सचिन रमेश दहिहंडे, तानाबाई देवआप्पा दहिहंडे, देवकाबाई मधुकर दहिहंडे, किरण रमेश दहिहंडे, बाबू प्रकाश दहिहंडे यांच्याविरोधात १४३, १४७, १४८, १४९, ३३७, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ 

Web Title: Two groups in Chitod village are thunderous clashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.