तळोदा बैलबाजारात ‘दोन हजारी’ चैतन्य
By admin | Published: April 28, 2017 03:58 PM2017-04-28T15:58:23+5:302017-04-28T15:58:23+5:30
तळोदा शहरात कालिका मातेच्या यात्रोत्सवाला पारंपरिक पद्धतीने सुरूवात झाली आह़े या यात्रोत्सवानिमित्त भरवण्यात येणा:या बैलबाजारात पहिल्याच दिवशी दोन हजारापेक्षा जास्त बैल विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
Next
>चिनोदा,दि.28- तळोदा शहरात कालिका मातेच्या यात्रोत्सवाला पारंपरिक पद्धतीने सुरूवात झाली आह़े या यात्रोत्सवानिमित्त भरवण्यात येणा:या बैलबाजारात पहिल्याच दिवशी दोन हजारापेक्षा जास्त बैल विक्रीसाठी दाखल झाले आहेत. शुक्रवारी दुपार्पयत बाजारात 1 हजार 400 बैलजोडय़ांची नोंद झाली होती़
अक्षयतृतीयेच्या मूहूर्तावर सुरू झालेल्या या यात्रोत्सवात गावरान, ठेलारी, माळवी, जर्सी, टापरी, राजस्थानी आणि पंजाबी जातीचे बैल व्यापा:यांनी विक्रीसाठी आणले आहेत़ यात ठेलारी आणि पंजाबी जातीच्या बैल जोडीची किंमत साधारण 1 लाख रूपयांर्पयत आह़े याठिकाणी गुरांच्या सोयीसाठी पशुवैद्यकीय अधिका:यांचे पथक तैनात केले आह़े सकाळी आठ वाजेपासून याठिकाणी बैलांच्या खरेदीविक्रीला पारंपरिक हातात हात घेत बैल खरेदी करण्याच्या पद्धतीने सुरूवात करण्यात आली़ खान्देश आणि गुजरात राज्यात प्रसिद्ध बैलबाजारातून बैलखरेदी करता यावा यासाठी मोठे शेतकरी तसेच लहान क्षेत्र असलेल्या शेतक:यांकडून सकाळपासून बैलांची पाहणी करण्यात येत होती़ जाणकार व्यक्ती बैलांची पाहणी करत असल्याचे चित्र याठिकाणी दिसून येत होत़े
या बैलबाजारासाठी जळगाव जिल्ह्यातील नेरी, जामनेर, पाचोरा आणि जळगाव परिसरातील बैल विक्रेते दाखल होतात़ यंदा मात्र या विक्रेत्यांची वाहने पोलीसांकडून अडवून त्यांना गुरे वाहून नेत असल्याच्या संशयावर ताटकळत ठेवण्यात आल्याने काही विक्रेते धुळे जिल्ह्यातून परत गेले आहेत़ धुळे-शिरपूर परिसरातून येणा:यांना हा त्रास झाल्याची माहिती देण्यात आली आह़े या चौकशीला कंटाळून अनेक शेतकरी धुळे जिल्ह्यातूनच परत गेल्याची माहिती समोर येत आह़े
(वार्ताहर)