दोंडाईचात युरीयाच्या दोनशे बॅग उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 09:54 PM2020-08-01T21:54:22+5:302020-08-01T21:54:44+5:30

दिलासा। मालपूर परिसरातील शेतकऱ्यांना होती खताची प्रतिक्षा

Two hundred bags of urea available in Dondaicha | दोंडाईचात युरीयाच्या दोनशे बॅग उपलब्ध

dhule

Next

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपून शिवारातील शेतकऱ्यांना गेल्या महिन्यापासून युरिया खताची टंचाई भासत होती़ दरम्यान, कृषी विभागाने युरीया खताच्या २०० बॅग उपलब्ध करुन दिल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़
मालपूर येथील शेतकरी दोंडाईचा येथे हातात पैसे घेवुन वणवण भटकत होते. परंतु युरीया खत मिळत नव्हते़ त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भिती शेतकºयांना होती़ यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित शेतकºयांची व्यथा मांडली होती़ तसेच तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे यांच्याकडे सतत पाठपुरावा देखील केला होता़ या वृत्ताची कृषी विभागाने दखल घेत दोंडाईचा येथील एका कृषी दुकानात दोनशे बॅग युरीया खतांचा पुरवठा करण्यात आला़़ खताच्या किमतीवर देखील कृषी विभागाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे़
मालपूरसह परीसरात शेती हाच मुख्य व्यवसाय असून शेतीच्या उत्पन्नावरच येथील अर्थचक्र अवलंबून आहे़ यामुळे पिकांची देखभाल व योग्य वेळी खत व्यवस्थापन खुप महत्वाचे आहे. मात्र हातात पैसे घेवुन येथील शेतकरी वणवण फिरतांना दिसुन येत होते. परंतु खत उपलब्ध होत नव्हते़
गरज नसताना खते उपलब्ध होत असतात मात्र गरजेवेळी का नाही. येथे सध्या गेल्या महिनाभरापासून खतांचा साठा संपल्याचे दुकानदार सांगत होते़ तर काही दुकानदार युरिया खताबरोबर अन्य अनावश्यक खतांचा लिंक पध्दतीने विक्री करत असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये होती़ या विषयी कृषी विभागाशी संपर्क केल्यावर देखील शेतकºयांचे समाधान होईल असा प्रतिसाद मिळत नव्हता़
मालपूर येथे युरियासह अन्य खतांची नेहमीच टंचाई जाणवत असते. मागेल ते बियाणे व पाहिजे तेवढे खत हा शेतकºयांचा अधिकार आहे़ परंतु कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा भावाने खतांची विक्री करण्याचा प्रकार दरवर्षी घडतो़ कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने शेतकरी नाडला जातो़ येथील बागायती कापुस व कोरडवाहू कापुस या दोघांना खत व्यवस्थापन करणे आवश्यक असते़ शेतकºयांना खतासाठी दोंडाईचा, शहादा, नंदुरबार अशी भटकंती करावी लागते़ मात्र सध्या कुठेही खत उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले होते. यामुळे बांधावर खत योजनेचा येथे पुरता फज्जा उडाला असुन दुकानात नाही तर बांधावर कुठुन येईल अशी स्थिती होती़ आडातच नाही तर पोहºयात कुठुन येईल असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली होती़ मात्र लोकमतच्या वृत्तानंतर शेतकºयांना खत उपलब्ध झाले आहे़ दोंडाईचा येथील दुकानातून शेतकºयांनी खत घ्यावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे़
आॅनलाईन नोंदणीचे काय झाले?
कृषी विभागाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका लिंकवर बियाणे व खतांची बुकिंग करण्याचे आवाहन केले होते. शेतकºयांनी प्रतिसाद देत नोंदणी केली होती़ मात्र या नोंदणीचे पुढे काय झाले हे त्या शेतकºयांना देखील माहित नसल्यामुळे प्रशासनाने शेतकºयांची फसगत असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे.

Web Title: Two hundred bags of urea available in Dondaicha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे