दोन प्रेमी युगलला अश्लिल वर्तन करताना पकडले, शिरपुरातील करवंद नाका येथील कॅफेवर पोलिसांचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 06:44 PM2023-07-13T18:44:45+5:302023-07-13T18:44:56+5:30

याठिकाणी दोन प्रेमी युगलला अश्लिल आक्षेपार्ह कृती करताना रंगेहात पकडण्यात आले.

Two lovers caught in the act of lewd behavior, | दोन प्रेमी युगलला अश्लिल वर्तन करताना पकडले, शिरपुरातील करवंद नाका येथील कॅफेवर पोलिसांचा छापा

दोन प्रेमी युगलला अश्लिल वर्तन करताना पकडले, शिरपुरातील करवंद नाका येथील कॅफेवर पोलिसांचा छापा

googlenewsNext

राजेंद्र शर्मा

शिरपूर : शहर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक छाया पाटील यांच्यासह पथकाने करवंद नाका परिसरातील एका कॅफेवर छापा टाकला. याठिकाणी दोन प्रेमी युगलला अश्लिल आक्षेपार्ह कृती करताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांना ताब्यात घेऊन समज देण्यात आली आणि नंतर सोडून देण्यात आले.

शिरपूर पोलिस ठाण्याचे पोंलिस कर्मचारी अतुल संजय निकम यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शिरपूर येथील करवंद नाका भागात एक कॅफे मालक हा शाळेतील मुला मुलींना, तरुण तरुणींना कॉफी देण्याच्या निमित्ताने कॅफेमध्ये खासगी जागा उपलब्ध करून देताे. अशा खासगी जागेत आक्षेपार्ह आणि असभ्य कृती करण्याची परवानगी देतात. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. उपद्रव वाढत आहे, अशा प्रकारची तक्रार शिरपूर शहर पोलिस ठाण्यात प्राप्त झाली. पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांनी दाखल तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक छाया पाटील आणि पथकाने दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक जाऊन त्या कॅफेवर छापा टाकला. येथे प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली असता एका खासगी जागेत मुलगा आणि मुलगी असे दोन जोडपे पोलिसांना आढळून आले. त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले.

दरम्यान, अधिक पैसे आकारून अशा जोडप्यांना खासगी जागा उपलब्ध करून देऊन त्यांना खासगी जागेत आक्षेपार्ह आणि असभ्य कृती करण्याची परवानगी दिली म्हणून कॅफे मालक राहुल सुरेश कोळी (वय २८, रा. वरवाडे ता. शिरपूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Two lovers caught in the act of lewd behavior,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.