मुंबई-आग्रा महामार्गावर दोन लक्झरी बसला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 06:22 PM2017-07-23T18:22:31+5:302017-07-23T18:22:31+5:30
चाळीसगाव चौफुलीवरील घटना : तीन अग्निशमनबंबानी विझविली आग, पोलिसांकडून कसून तपास
Next
ऑ लाईन लोकमतधुळे,दि.23 - शहरानजीक मुंबई-आग्रा राष्ट्रीय मार्गावर चाळीसगाव चौफुलीजवळ शनिवारी रात्री दोन लक्झरी बसला आग लागल्याने जळाल्या. शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता ही घटना घडली. तीन बंबांनी ही आग आटोक्यात आणली. दोन लाखांचे नुकसान झाले असून कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाजवळ चाळीसगाव चौफुली जवळ अपना स्प्रे पेंटींग नावाचे दुकान आह़े या ठिकाणी साई सिध्दी लक्झरी एमएच 14 सीडब्ल्यू 501 आणि सोनपरी लक्झरी एमएच 19 वाय 7999 या क्रमांकाची दुसरी लक्झरी उभी होती़ या दोन्ही वाहनाचे प्लायवूड आणि कापडी कुशनचे काम सुरु होत़े अशातच अचानक शनिवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास बॅटरीला लागलेल्या शॉटसर्किटमुळे आग लागली़ त्यामुळे कापडी कुशन आणि प्लॉयवूड जळून खाक झाले. यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होत़े या आगीत दोनही लक्झरीचे सुमारे 2 लाखांचे नुकसान झाले आह़ेआगीच्या घटनेनंतर मनपा अग्निशमन विभागाशी संपर्क साधून बसेसला आग लागल्याची माहिती देण्यात आली होती़ मनपाचे दोन बंब तत्काळ घटनास्थळी पोहचले. मात्र आगीने रौद्रस्वरुप धारण केल्यामुळे अवधान टोलनाक्यावरून आणखी एक बंबास पाचारण करण्यात आले. तिघा बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. गुड्डया खून प्रकरणाशी या घटनेचा काही एक संबंध नाही. घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहचलो. त्या नंतर अगिAशमन बंबांच्या सहाय्याने आग विझविण्यात यश मिळाले. ही आग कशी लागली, याबाबत तपास सुरू आहे. - विवेक पानसरे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे