वारुडची तहान भागविणार दोन कोटींचे पाणी!
By admin | Published: January 15, 2017 12:45 AM2017-01-15T00:45:04+5:302017-01-15T00:45:04+5:30
जिल्हा परिषद : मुख्यमंत्री पेयजेल योजनेंतर्गत स्वतंत्र योजनेच्या निधीला तत्त्वत: मंजुरी
धुळे : बाराही महिने पाणीटंचाईचा सामना करणा:या वारुड या शिंदखेडा तालुक्यातील गावाची तहान भागविण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांच्या स्वतंत्र योजनेव्दारे पाणी आणले जाणार आह़े मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत वारुड गावासाठी स्वतंत्र पाणी योजनेला तत्त्वत: मंजुरी मिळाली आह़े
शिंदखेडा तालुक्यातील वारुड या गावाला बाराही महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई सहन करावी लागत होती़ भरपावसाळ्यातही या गावाला जिल्हा परिषद प्रशासनाने टँकरव्दारे पाणीपुरवठा केला होता़ त्यामुळे सदर गावाच्या पाणीटंचाईचा प्रश्न शासन दरबारी सातत्याने मांडण्यात आला होता़ मात्र मध्यंतरीच्या काळात शासनाने नवीन पाणी योजना देण्यास स्थगिती दिल्याने वारुडचा पाणीप्रश्न वर्षभर टँकरवरच अवलंबून होता़ दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने वारंवार शासन दरबारी वारूडचा पाणीप्रश्न मांडला़ त्यासाठी पाठपुरावाही केला. त्यास प्रतिसाद देत अखेर मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत 1 कोटी 98 लाख 92 हजार रुपयांच्या स्वतंत्र पाणी योजनेला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आह़े त्यामुळे वारुड गावाचा पाणी प्रश्न अखेर सुटणार आह़े सदर योजनेसाठीच्या निधीत वाढ होण्याचीही शक्यता आह़े