उत्तर प्रदेशातील आणखी दोन प्रकार उघडकीस, एका पीडितेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 01:18 AM2020-10-02T01:18:32+5:302020-10-02T01:19:09+5:30

बलरामपूर जिल्ह्यात बलात्काराची घटना; दोन जणांना अटक

Two more types of Uttar Pradesh uncovered, one victim killed | उत्तर प्रदेशातील आणखी दोन प्रकार उघडकीस, एका पीडितेचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील आणखी दोन प्रकार उघडकीस, एका पीडितेचा मृत्यू

googlenewsNext

बलरामपूर : उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यामध्ये दलित मुलीवरील बलात्कार प्रकरणामुळे देशात संतापाचे वातावरण असतानाच त्याच राज्यातील बलरामपूर जिल्ह्यातील गैसारी गावातील २२ वर्षे वयाच्या बलात्कारपीडित मुलीचाही मृत्यू झाला आहे. हाथरस येथील व बलरामपूरची बलात्कारपीडित मुलगी एकाच दिवशी, मंगळवारी मरण पावल्या. बलात्काराच्या घटनेत त्या दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या. या दोन्ही मुलींवर त्यांच्या जिल्ह्यात बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. बलरामपूर येथील बलात्कारप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी शाहिद व साहिल या दोघांना अटक केली.

बलरामपूर बलात्कारपीडितेच्या आईने सांगितले की, बलात्कार करणाऱ्यांनी मुलीचे पाय तोडले व मणक्याला गंभीर दुखापत केली. ती महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी गेली होती. तिथून परतताना तीन ते चार लोकांनी अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. बलरामपूर प्रकरणासंदर्भात त्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक देवरंजन वर्मा यांनी सांगितले की, बलात्कारपीडित मुलगी एका खासगी कंपनीत काम करते. ती घरी परतली तेव्हा अत्यंत घाबरलेली होती व तिच्या हातावर इंजेक्शन टोचण्यासाठी आवश्यक असलेला कॅन्यूला लावलेला होता. तिला रुग्णालयात नेले जात असताना ही मुलगी वाटेतच मरण पावली. या मुलीच्या मृतदेहाच्या शवचिकित्सेमध्ये तिचे पाय, मणक्याला काहीही दुखापत झालेली नाही, हे दिसून आले.

आणखी दोन प्रकार उघडकीस
च्उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे चांगली नोकरी मिळवून देतो, असे सांगून एका युवतीला फसविले व तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी फरार आहे. याच राज्यातील आझमगढ जिल्ह्यामधील एका गावात आठ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजारी राहणाºया २० वर्षे वयाच्या मुलाने बलात्कार केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Two more types of Uttar Pradesh uncovered, one victim killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.