लाचप्रकरणी दोन मोटारवाहन निरीक्षकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:54 AM2018-12-13T11:54:00+5:302018-12-13T11:55:23+5:30

हाडाखेड तपासणी नाका : घटनेनंतर पंटर फरार

Two motor vehicle inspectors arrested in connection with the bribe | लाचप्रकरणी दोन मोटारवाहन निरीक्षकांना अटक

लाचप्रकरणी दोन मोटारवाहन निरीक्षकांना अटक

Next
ठळक मुद्देपंटरने केली ५०० रूपयांच मागणीदोघ निरीक्षकांना घेतले ताब्यातपंटर झाला फरार

आॅनलाइन लोकमत
शिरपूर, जि.धुळे  : शिरपूर तालुक्यातील हाडाखेड तपासणी नाका परिसरात वाहन जावू देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते़ कागदपत्र पूर्ण असूनही अशी ही स्थिती असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती़ तक्रारीच्या अनुषंगाने पथकाने हाडाखेड तपासणी नाक्यावर सापळा लावला होता़ बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सापळा लावण्यात आला़ हाडाखेडा सीमा तपासणी नाका परिवहन कार्यालय येथील मोटार वाहन निरीक्षक सचिन शिवाजी पाटील आणि गणेश सजन पिंगळे यांना अटक करण्यात आली़ 
या दोघांच्या संमती व प्रोत्साहनामुळे खासगी पंटरने ५०० रुपये लाचेची मागणी केली़ या दोघा निरीक्षकांना ताब्यात घेतल्यावेळी खासगी पंटर घटनास्थळावरुन फरार झाला़ ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, पवन देसले यांच्यासह पथकाने कारवाई केली़ 

 

Web Title: Two motor vehicle inspectors arrested in connection with the bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.