धुळे जिल्ह्यात दोघांनी गळफास घेत जीवन संपविले, वेगवेगळ्या घटनात अकस्मात मृत्यूची नोंद
By अतुल जोशी | Published: May 2, 2024 05:14 PM2024-05-02T17:14:02+5:302024-05-02T17:14:10+5:30
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये युवतीसह एका वृद्धाचा समावेश आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
धुळे : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ मे रोजी घडली. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये युवतीसह एका वृद्धाचा समावेश आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पाचमौली येथे युवतीची आत्महत्या
साक्री तालुक्यातील पिंजारझाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पाचमौली येथील राणीबाई विजय पवार (वय २०) हिने आपल्या शेतातील घरात लोखंडी ॲन्गलला झोका बांधलेल्या दोरीने गळफास घेतला. तिला नातेवाईकांनी तत्काळ साक्री येथील ग्रामीण रूग्णलयात दाखल केले असता डॉ. गिरे यांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी साक्री पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक पी.डी.रौंदळ करीत आहेत.
विसरणेत वृद्धाची आत्महत्या
धुळे तालुक्यातील विसरणे येथे पांडुरंग सखाराम पाटील (वय ६७, रा. विसरणे,ह.मु. उधना सुरत) यांनी गावाच्या शिवारातील शेतातील झाडाला सुती दोरीच्या साह्याने १ मे रोजी दुपारी गळफास घेतला. त्यांना ग्रामस्थ व नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. भैरव वडजे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक एल.डी. खळगे करीत आहेत.