शिंदखेड्यात पाणी भरण्यावरुन हाणामारी, दोन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:18 PM2019-02-19T22:18:00+5:302019-02-19T22:18:47+5:30
चार जणांच्या विरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल
शिंदखेडा : शहरात पाणी भरण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत दोन जण जखमी झाले. त्यात एक जण गंभीर जखमी असल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी धुळ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात चार जणांच्या विरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील अजबसिंह हारसिंह गिरासे यांच्याकडे रविवारी धार्मिक कार्यक्रम असल्याने पाणी भरण्यासाठी रविंद्र केवलसिंह गिरासे व जितेंद्रसिंह सुरतसिंह गिरासे हे गावातील बाळू वाणी यांच्या खासगी बोअरवर पाणी घेण्यासाठी गेले होते. यावेळी देवेंद्र गिरासे यानी प्रथम मी पाणी भरण्याच्या वादातून किरकोळ स्वरूपाचा वाद झाला होता व वाद मिटविण्यात आला होता.
त्यानंतर सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अजबसिंह हारसिंह गिरासे व त्यांचे मुले प्रेमसिंह अजबसिंह गिरासे व चंद्रसिंह अजबसिंह गिरासे हे त्यांच्या गावाजवळील शेतात काम करीत होते. तेव्हा शहरातील योगेश रजेंसिंह गिरासे, कोमलसिंह विजयसिंह गिरासे, रजेंसिंह उदेसिंह गिरासे व देवेंद्र गिरासे हे लाठया - काठ्या घेवून शेतात आले. शिवीगाळ करीत लाठया काठ्यानी हल्ला चढविला. त्यात प्रेमसिंह गिरासे यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. तर चंद्रसिंह गिरासे हा ही जखमी झाला. त्
याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात चंद्रसिंह अजबसिंह गिरासे यांने फिर्याद दिल्या वरून योगेश रजेंसिंह गिरासे , कोमलसिंह विजयसिंह गिरासे, रजेंसिंह उदेसिंह गिरासे व देवेंद्र गिरासे यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर १५ /२०१९, भादवी ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिमठाणे पोलिस दुरक्षेत्राचे हवालदार सोनवणे व नाईक आणि संदीप मोरे करीत आहेत.