धुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दोनजण ठार
By अतुल.रत्नाकर.जोशी | Published: April 4, 2024 07:54 PM2024-04-04T19:54:55+5:302024-04-04T19:55:00+5:30
तपास पोलिस उपनिरीक्षक मुंडे करीत आहेत.
धुळे : जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार ठार तर एकजण जखमी झाला. याप्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
ट्रकने (क्र. एमएच ४१-एटी८५८७) दुचाकीला (एमएच ४१-क्यू.५७०५) मागून जोरदार धडक दिल्याची घटना अवधान डिसान फाट्याजवळ बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात मुरलीधर गाेरख पाटील (वय ४५,रा. धाडरी,ता.धुळे) हे ठार झाले. याप्रकरणी राजाराम भिका पाटील (वय ५५, रा.धाडरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहाडीनगर पोलिस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक मुंडे करीत आहेत.
दोन दुचाकींची धडक, एक ठार, एक जखमी
धुळे तालुक्यातील सायने फाट्याकडून सरवडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. हा अपघात २ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात गोपीचंद पंडित पाटील (वय ४५, रा. नंदाणे, ता.धुळे) हे ठार झाले. तर जीवन देविदास महाले हे जखमी झाले. याप्रकरणी महेंद्र पाटील यांनी सोनगीर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून एमएच १८-बीडब्ल्यू.८०१५ या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक सुकदेव धरम हे करीत आहेत.