धुळ्यात साक्रीजवळ प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, पायलटसह पाच जण किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 09:15 PM2017-12-01T21:15:28+5:302017-12-01T21:46:25+5:30

Two pilgrims injured along with pilots injured in a plane crash in Dhule near Sakri | धुळ्यात साक्रीजवळ प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, पायलटसह पाच जण किरकोळ जखमी

धुळ्यात साक्रीजवळ प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, पायलटसह पाच जण किरकोळ जखमी

googlenewsNext

धुळे : धुळ्यातील साक्रीजवळील शेवाळी फाट्याजवळ प्रशिक्षणार्थी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे कोसळल्याचे वृत्त आहे. या अपघातात विमानाच्या पायलटसह दोन जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येते. 
मिळालेल्या माहितीनुसार, सुरतहून धुळ्याकडे जात असताना सात वाजून 45 मिनिटांच्या सुमारास साक्रीमधील शेवाळी फाट्याजवळ असलेल्या दातर्ती गावाजवळ बॉम्बे फ्लाईंग क्लबच्या विमानाचे क्रॅश लँडिंग झाले. यामध्ये पायलटसह पाचजण प्रशिक्षणार्थी होते. या प्रशिक्षणार्थीमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. दरम्यान, विमानात बिघाड झाल्याचे लक्षात येताच पायलट जे. पी. शर्मा यांनी तात्काळ विमान नागरी वस्तीपासून दूर नेले. त्यामुळे  पायलट जे. पी. शर्मा यांनी वेळीच दाखवलेल्या या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या अपघातात पायलट जे. पी. शर्मा किरकोळ जखमी झाले असून बाकीचे प्रशिक्षणार्थी सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी गावक-यांनी एकच गर्दी केली होती. 
दरम्यान, पायलट जे.पी. शर्मा यांना प्राथमिक उपचारांसाठी साक्री येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Two pilgrims injured along with pilots injured in a plane crash in Dhule near Sakri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात