पुरमेपाडा शिवारातील विचित्र अपघातात महिला ठार, 18 प्रवाशांसह दोन पोलीस जखमी
By admin | Published: April 14, 2017 05:59 PM2017-04-14T17:59:43+5:302017-04-14T17:59:43+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा शिवारातील शनीमंदिराजवळ शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास खासगी प्रवासी आरामदायी बसने पुढे चालणा:या ट्रकला मागून धडक दिली.
Next
पुरमेपाडा शिवार : जखमींना रूग्णवाहीकेत टाकतांना ट्रकची पोलीस वाहनाला धडक
धुळे,दि.14- मुंबई-आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा शिवारातील शनीमंदिराजवळ शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास खासगी प्रवासी आरामदायी बसने पुढे चालणा:या ट्रकला मागून धडक दिली. त्यात बसमधील एका अनोळखी महिला ठार व 18 प्रवासी जखमी झाले. दरम्यान, त्या जखमींना रूग्णवाहीकेत टाकतांना जवळ उभ्या पोलीस वाहनाला भरधाव ट्रकने धडक दिली़ पोलीस वाहन रूग्णवाहीकांवर आदळल़े त्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल़े
मालेगावकडून धुळ्याकडे येणारी खासगी प्रवासी बस (एमपी 09-जी 1623) शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पुरमेपाडा शिवारातील हॉटेल शिवशक्ती व शनिमंदिरा पुढे चालणा:या ट्रकवर (एमएच 15-ईई 2545) आदळली. त्यात बसमधील अनोळखी महिला (वय 50) ठार झाली. तर अत्तारसिंग (34), हेरेन भिलाजी (47) रा.बेंगलोर, दर्शन एच.एल (21) रा.कर्नाटक, रूपल संतोष बिलेख्या (20), स्वप्नील संजय बुगले (30) रा.पाथर्डी, राघवेंद्र रणवीर भडेरीया (52) रा.ग्वाल्हेर, भास्कर प्रसाद रामअवतार (57) रा.हैद्राबाद, विजयलक्ष्मी भास्कर प्रसाद (52) रा. हैद्राबाद, संजय पुरोहित (48) रा.इंदूर, राजू यादव (30) रा.इंदूर, निनाज हेबजोर कुरेशी (30) रा.महु (मध्यप्रदेश), राजा ना:या पवार (33) रा. बंगलगांव, हितेष शंकरलाल भोई (32), केशरबाई हितेष भोई (28), प्रेमकुमार हितेष भोई (12), सागर हितेश भोई (8), सर्व रा.बगेदा ता. आसपूर जि.डोंगरपूर (राजस्थान), आसीम बागरे (21) रा.हरदा इंदूर, मोमीन मोमय्या (23) रा.इंदूर हे जखमी झाले. यांना शासकीय रूग्णवाहिकेतून मालेगाव व धुळे येथील हिर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे.
याठिकाणी एक रूग्णवाहिका जखमींना घेऊन गेली होती. तर दुसरी मालेगांव येथील रूग्णवाहिका (एमएच 14- जीएल 0411) आली होती. तिला लाईट नसल्याने त्यामागे पोलीस वाहन अंबर दिवा व इंडीकेअर लावून उभे करून जखमींना रूग्णवाहिकेत बसवित असतांना मालेगावकडून येणा:या ट्रकने (एमपी 07-एमबी 3986) पोलीस वाहनाला धडक दिली़ त्यामुळे पोलीस वाहन रूग्णवाहीकेवर (एमएच 18-अेअे 0310) व ( एमएच 14 सीएल 0411) आदळल़े त्यात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले. त्यात हवालदार छगन नथ्थू शिवदे व नारायण देसले हे दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांनाही 108 क्रमांकाच्या रूग्णवाहीकेव्दारे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल़े