डय़ूटीवरील दोन पोलिसांचे जबाब नोंदविले!
By Admin | Published: March 17, 2017 12:05 AM2017-03-17T00:05:54+5:302017-03-17T00:05:54+5:30
कोठडीतील आत्महत्या प्रकरण : सीआयडी पथकाचे धुळ्यात ठाण, ‘आयएमए’-अधिष्ठाता आमनेसामने
धुळे : शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरला झालेल्या मारहाण करणा:या अटकेत असलेल्या एका संशयिताने पोलीस कोठडी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान गुरुवारी सीआयडी पथकाने मंगळवारी घटनेच्या वेळी शहर पोलीस स्टेशनला डय़ूटीवर असलेल्या दोन पोलीस कर्मचा:यांचे जाबजबाब नोंदविले.
हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ़ रोहन म्हामुणकर यांना बेदम मारहाण झाल्याची घटना रविवारी रात्री घडली होती़ याप्रकरणी अटक केलेल्या नऊ संशयितांपैकी प्रदीप वेताळ या तरुणाने मंगळवारी शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेचा तपास सीआयडीचे पथक करीत आहे. नाशिक येथील सीआयडीचे पोलीस अधीक्षक रमेश गायकवाड बुधवारपासून धुळ्यात तळ ठोकून आहे. बुधवारी त्यांनी घटनास्थळासह अनेक बाबींची तपासणी केली़ गुरुवारी दिवसभरात सीआयडी अधिका:यांनी त्या घटनेच्या वेळी पोलीस कोठडीच्या डय़ूटीवर असलेले पोलीस कर्मचारी जवाहर पवार आणि दत्तू अहिरे यांचे जाबजबाब नोंदविले.
चैत्रामविरुद्ध गुन्हा
दुचाकीने (क्ऱ एमएच 18-एव्ही 8456) सुरत बायपास चौफुलीकडून चक्करबर्डीकडे जात असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चैत्राम उर्फ शत्रू शिवाजी लष्कर (वय 29, रा़ चक्करबर्डी) याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता, तर मागे बसलेला प्रदीप सदाशिव वेताळ (मयत) हा जखमी झाला होता़ ही घटना 12 मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली होती़ याप्रकरणी पो़ह़ेकॉ. व्ही़यू़जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मयत चैत्राम लष्कर याच्याविरुद्ध भादंवि कलम 304 अ, 279, 337, 338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े