धुळ्यात दोन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 11:56 AM2020-05-03T11:56:05+5:302020-05-03T11:56:27+5:30
संख्या झाली ३० : आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
धुळे :शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शनिवारी रात्री आणखी दोन पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३० झालेली आहे.
महाराष्टÑदिनी एकही रूग्ण न आढळल्याने काहीसा दिलासा मिळालेला होता. मात्र शनिवारी शहरातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात धुळे येथील गरिब नवाज नगरातील एका ४० वर्षीय महिला व ८३ वर्षीय वृद्धाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ३० झालेली आहे. यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
तिसरा नाशिकला
नाशिक येथील रूग्णालयात उपचार घेत असलेल्या धुळ्यातील गल्ली नं.सहा मधील ज्येष्ठ नागरिकाचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे. त्याची तपासणी नाशिक येथेच झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असले तरी जिल्ह्यातील बाधितांचा आकडा मात्र दोननेच वाढला आहे.नाशिकच्या बाधितची नोंद नाशिक जिल्ह्यात करण्यात आली आहे. दरम्यान या बाधितच्या परिवारातील सदस्याची तपासणी रविवारी धुळ्यात करण्यात येणार आहे.