अवधान शिवारातून दोन टन प्लास्टिक माल केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:29 AM2019-08-29T11:29:26+5:302019-08-29T11:29:42+5:30

महापालिका : व्यापाºयांचे धाबे दणाणले; प्रदूषण मंडळाची कारवाई 

Two tonnes of plastic material seized from Aadhaan Shivar | अवधान शिवारातून दोन टन प्लास्टिक माल केला जप्त

अवधान येथील कारवाई जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

Next

धुळे : आरोग्यावर विपरीत परिणाम करणाºया प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतांना देखील शहरात प्लॅस्टिक पिशव्याचा सरार्सपणे वापर केला जात असल्याचे वृत्त लोकमतने २५ आॅगस्ट रोजी प्रसिध्द केले होते़ यावृत्ताची जिल्हाधिकाºयांनी दखल घेऊन कारवाईचे आदेश दिल्यानंतर मनपाच्या इतिहासात पहिल्यादा बुधवारी केलेल्या कारवाईत तब्बल २ टन माल जप्त करण्यात आला़
अवधान शिवारातील हॉटेल  रेसिडेन्सी पार्कसमोर असलेल्या गोडाऊनवर बुधवारी सकाळी अकरा वाजता प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिका प्लॅस्टिक निमुर्लन पथकाच्या संयुक्त विद्यमाने अवधान शिवारातील मयूर ट्रेडर्स, सुनील ट्रेडर्स, व कृष्णा ट्रेडर्स या तिघांच्या गोडाऊनवर कारवाई करून सुमारे दोन टन प्लॅस्टीक माल पथकाने जप्त करून पंचनामा करण्यात आला होता़ यावेळी तिनही कंपन्यांना प्रत्येकी २५ हजार असा ७५ हजारांचा  दंड ठोठावण्यात आला आहे़ मनपाच्या इतिहासातील सर्वात मोठी केलेल्या कारवाईमुळे प्लास्टिक वापर व विक्री करणाºया व्यापाºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़
सदरची कारवाई जिल्हाधिकारी तथा आयुक्त गंगाधरण डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आली़ कारवाईत मनपा उपायुक्त गणेश गिरी, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी सौजन्या पाटील, वरिष्ठ लिपिक वंदना जाधव, अभियंता कैलास शिंदे, प्लास्टिक निर्मूलन पथक प्रमुख नंदू बैसाने, मुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरिक्षक राजेश वसावे, संदीप मोरे यांच्यासह  मनपाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
अन्यथा होईल कारवाई
प्लॅस्टीक वापर टाळण्यासाठी छोटया विक्रेत्यांपेक्षा मोठया विक्रेत्यांकडे  मनपाच्या पथकाकडून लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे़  याबाबत वारंवार शोध मोहिम व दंड आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

Web Title: Two tonnes of plastic material seized from Aadhaan Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे