सोनगीरजवळ दोन ट्रकची धडक, दोन ठार, तीन जखमी
By admin | Published: July 7, 2017 02:10 AM2017-07-07T02:10:53+5:302017-07-07T02:10:53+5:30
सोनगीर : दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. ही घटना सोनगीरनजीक वाघाडी फाट्यापासून काही अंतरावर गुरुवारी पहाटे घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनगीर : दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. ही घटना सोनगीरनजीक वाघाडी फाट्यापासून काही अंतरावर गुरुवारी पहाटे घडली.
राजस्थानहून फरशी घेऊन धुळ्याकडे येत असलेल्या आरजे १७ - जीए ५७३७ क्रमांकाच्या ट्रकवर वाघाडी फाट्यावर गुरुवारी पहाटे धुळ्याकडून येणारा टीएन ५२-एच ९१२३ क्रमांकाचा ट्रक समोरून येऊन धडकला. अपघातात फरशीच्या ट्रकमधील क्लिनर कमलसिंग रामप्रसाद डांगी (२४) हा फरशीखाली दाबला गेल्याने जागीच ठार झाला़, तर दुसºया ट्रकमधील जखमी आऱ अरुणकुमार राज (२१) रा़ तामिळनाडू याचा हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाला.
तीन जखमी
अपघातात पसणीबोरा किन्नकंबी (२८) रा़ भुजीनक्काम, ता़ आराघ, जि़ धर्मपुरी, तामिळनाडू, राजेश आणि राहुल कन्हैयालाल चव्हाण (२७) रा़ झिरापूर, जि़ राजगड, राजस्थान हे तिघे जखमी झाले आहेत़ त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
एकेरी वाहतुकीमुळे अपघात
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाघाडी फाट्यापासून ते बाभळे फाट्यापर्यंत धुळ्याकडून शिरपूरकडे जाणाºया रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे़
यामुळे वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. यामुळे भरधाव वेगाने येणाºया गाड्या समोरासमोर येतात व अपघात घडतात.
अपघाताचे वृत्त कळताच सोनगीर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेंद्र पाटील हे सहकाºयांसह घटनास्थळी धावले़ त्यांनी अपघातातील मृत आणि जखमींना ताबडतोब उपचारार्थ धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात पाठविले.
वाहतुकीवर परिणाम
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत़