वाहून जाणाऱ्या दुचाकीस्वार जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 10:01 PM2019-09-24T22:01:57+5:302019-09-24T22:02:35+5:30
अमराळे येथील घटना : फरशी पुलावरून जात असतांना पाण्यात वाहून जात होता
शिंंदखेडा : वाडी शेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने तालुक्यातील अमराळे येथील बुराई नदीवरील फरशी पूलावरून पाण्याचा प्रवाह सुरू असतांना दुचाकीस्वार पुल ओलाडतांना दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असतांना काही गावातील तरूणांच्या मदतीने त्यांला वाचविण्यात आले़
पत्नीला माहेरून घेण्यासाठी दुचाकीवरून वडणे-बुरझड येथील निघालेला अरुण आत्माराम शिंदे वय २६ हा तरूण दुचाकीवरून वडणे गावावरून अमराळेमार्गे नंदूरबारकडे जात असतांना अमराळे गावाजवळ लागणाºया बुराई नदीवरील तळफरशी पुलावरुन पाण्याचा प्रवाह सुरू असतांना देखील शिंदे यांने पाण्यातून पुल ओलाडण्याचा प्रयत्न केला़ यावेळी काही तरूणांनी त्याला पुल ओलाडण्यासाठी विरोध देखील केला होता़ मात्र तरीही त्याने पुलावरून दुचाकीने जाण्याचा प्रयत्न केला़ दरम्यान पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शिंदे हा दुचाकीसह पाण्यात दिशेन वाहू लागला होता़ ही घटना नदीकाठावर बसलेले अमराळे येथील सुनील पंडित बोरसे, खंडू निंबा पाटील यांच्यासह काही तरुणांच्या लक्षात आल्याने त्यांनी पाण्यात उड्या टाकून तरुणाला पाण्यातून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले़ तरूणांच्या धाडसाचे सर्वत्र कौंतुक होत आहे.
हा फरशी पुल धुळे व नंदूरबार जिल्ह्याला जोडणारा आहे़ येथे छोटा पुल होण्यासाठी अनेक वर्षापासून अमराळे ग्रामस्थांची मागणी आहे़ मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना घडतात़