पोलिसाच्या मारहाणीनंतर दोन तरुण बेपत्ता
By admin | Published: March 20, 2017 11:45 PM2017-03-20T23:45:32+5:302017-03-20T23:45:32+5:30
चित्रफीत ‘व्हायरल’ : कारवाईच्या मागणीसाठी ‘रास्ता रोको’; पोलिसासह तिघांविरुद्ध गुन्हा
साक्री : एका पोलिसाने गावातील साथीदारांच्या मदतीने एक महाविद्यालयीन विद्यार्थी व एक व्यावसायिक तरुण अशा दोघांना बेदम मारहाण केल्याची चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. यातील दोषी पोलिसावर त्वरित कारवाई करण्याची मागणी बोदगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे. कन्हैयालाल ब्रिजलाल ठाकरे (रा. बोदगाव) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर कन्हैयालाल ठाकरे व तो परप्रांतीय व्यावसायिक बेपत्ता आहे.
कन्हैयालाल हा साक्री येथील विमलबाई महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तो दहीवेल येथे मित्राच्या खोलीवर राहत होता. रविवारी रात्री दहीवेल औट पोस्टचे पोलीस सुनील कोतवाल व गावातील हिरामण माळी व महेंद्र बच्छाव यांनी त्याला जबर मारहाण केली. मात्र या मारहाणीमागचे कारण कळू शकलेले नाही. मारहाणीवेळी अज्ञात इसमाने या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर ही चित्रफीत व्हायरल झाली. या चित्रफीतमध्ये कोतवाल हे कमरपट्टय़ाने कन्हैयालाल याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. इतर दोन व्यक्तींनीही त्याला बेदम मारहाण केल्याचे दिसते. या विद्याथ्र्याबरोबर दहीवेल येथे चायनीज खाद्यपदार्थ विकणा:या एका परप्रांतीय मुलालाही मारहाण झाली आहे. या घटनेतील पोलीस कर्मचारी याने पोलीस पोशाखात ही मारहाण करताना शर्टवर जर्किन घातले आहे. चित्रफितीत आदिवासी तरुण मारू नका, अशी विनंती पोलिसाला करताना दिसत आहे. ही चित्रफीत व्हायरल झाल्याने संबंधित तरुणाच्या गावातील आदिवासी ग्रामस्थांनी साक्री पोलीस ठाण्यात धाव घेऊन मारहाण करणा:या कर्मचा:याची चौकशी करून त्यास त्वरित निलंबित करावे आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली़ त्यानुसार, साक्री पोलिसात ब्रिजलाल ठाकरे यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणा:या तिघांविरुद्ध भादंवि कलम 341, 342, 343, 365, 452, 324, 323, 504, 506, 34 व अ़जा़ज़ अत्याचारास प्रतिबंध सुधारणा कायदा कलम सन 2015 चे ड (1)(आर)(एस) अन्वये गुन्हा दाखल झाला़
नातेवाइकांचा ‘रास्ता रोको’
4सोमवारी सायंकाळी कन्हैयालाल ठाकरे या तरुणाच्या नातेवाइकांनी सुरत-नागपूर महामार्गावरील साक्री पोलीस स्टेशनसमोर रास्ता रोको केला.
या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चार पथके स्थापन केली असून ती अटकेच्या कारवाईसाठी रवाना झाली. लोकेशन घेऊन ते आरोपीस लवकरात लवकर अटक करतील.
- नीलेश सोनवणे,
उपअधीक्षक, साक्री विभाग
दहीवेल औट पोस्टचे कर्मचारी असलेले सुनील कोतवाल यांची काही दिवसांपूर्वी साक्री पोलीस स्टेशनला बदली झाली आहे. तरीही कोतवाल हे दहीवेल येथे जाऊन काय करत होते? असा प्रश्न पुढे आला आहे.