उंभर्टी पाझर तलावास गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:20 PM2019-08-18T12:20:59+5:302019-08-18T12:21:27+5:30

परिसरातील विविध गावांमध्ये भीती, प्रशासन अलर्ट

Umberti leaks into the pond | उंभर्टी पाझर तलावास गळती

उंभर्टी पाझर तलावास गळती

Next

साक्री : साक्री तालुक्यातील उंभर्टी येथील पाझर तलावाला गळती लागल्याने शेतकºयांसह गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़ पाझर तलाव फुटू नये म्हणून धुळे जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने तलावाच्या बाजूने पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत़ परंतु काही शेतकºयांनी त्याला विरोध दर्शवल्याने प्रशासन पेचात सापडले आहे़ 
तलाव फुटण्याच्या शक्यतेने महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने तलावाच्या खालच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे़ नदीकाठच्या गावांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत़ संध्याकाळपर्यंत शेतकºयांची समजूत घालण्याचे प्रयत्न प्रशासन स्तरावर सुरू होते़ अनेक वर्ष जुना असलेला हा पाझर तलाव यावर्षी झालेल्या प्रचंड पावसामुळे तुडुंब भरला आहे़ त्यामुळे पाझर तलावाच्या खालच्या भागातून पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाला कळविण्यात आले होते़ त्यानुसार सिंचन विभागाचे अभियंते, पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे तहसीलदार संदीप भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली असता तलावाच्या खालच्या बाजूने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचे दिसून आले़ जास्त पाणी साचल्याने हा बंधारा फुटू  शकतो व खालच्या शेतीला व गावांना धोका निर्माण होऊ शकतो़ म्हणून तलावाच्या बाजूने जेसीबी यंत्राच्या साह्याने पाणी काढण्याची जागा तयार करण्याची सुरुवात झाली होती़ परंतु काही शेतकºयांनी त्याला विरोध दर्शवल्याने काम थांबून होते़ जर हा बंधारा खरोखर तुटला तर तलावाच्या खालील शेत जमीन वाहून जाईल या शक्यतेमुळे बंधाºयाच्या बाजूने पाणी काढल्यावर पाणी कमी होईल़ यामुळे बंधारा फुटण्याची शक्यता राहणार नाही़ यासाठी प्रशासन प्रयत्न करत होतो तसेच ज्या ठिकाणाहून पाण्याची गळती सुरू होती तेथेही मोठे दगड टाकून तात्पुरता अडथळा निर्माण करण्यात आला आहे़ तलावाच्या ज्या बाजूने पाणी काढण्याचे काम सुरू होते़ तेथे खाली खडक असल्याने त्यालाही मर्यादा आल्या आहेत़ कासारे गावातही पाणी वाढणार असल्याची दवंडी देण्यात आल्याने कासारे ग्रामस्थांमध्ये ही भीतीचे वातावरण पसरले होते़ 

Web Title: Umberti leaks into the pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.