‘सैन्य दलातील गोपनीय बाबी उघडकीस आणू’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:32 AM2019-10-07T04:32:02+5:302019-10-07T04:32:20+5:30
'पाकिस्तानात नजरचुकीने गेलो नाही. तरी देखील शिक्षा मिळाली.'
धुळे : पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झालेले भारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राजीनामा दिला. पाकिस्तानात नजरचुकीने गेलेलो नसतानाही चुकीचे कागदपत्र बनवून झालेली दिशाभूल, अधिकाऱ्यांकडून होणारा अन्याय, सैन्य भरतीतील भ्रष्टाचार तसेच सैन्यावरील अन्याय थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी डी़ गंगाथरण यांना चाळीसगाव मित्र परिवार व माजी सैनिकांकडून सोमवारी सकाळी निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.
पाकिस्तानात नजरचुकीने गेलो नाही. तरी देखील शिक्षा मिळाली. अधिका-यांनी माझ्यावर दडपण आणत बनावट कागदपत्रे बनविली़ त्याचे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत़ सैन्य दलाची भरती कशी होते, त्यासाठी काय केले जाते, याबाबत लोकांना माहिती नाही़ मात्र मला मृत्यू जरी पत्करावा लागला तरी या गोष्टी उघडकीस आणेल़ यासाठी चाळीसगाव मित्र परिवार व माजी सैनिकांसह खान्देशातील सैनिकांनी मदत करावी, असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे़