अक्कलपाडा भूसंपादनात अक्षम्य चुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:48 PM2019-08-10T22:48:10+5:302019-08-10T22:48:34+5:30

जमिनी गेल्याने शेतकरी हवालदिल : किमान मोबदला देण्याची एकमुखी मागणी

Unforced errors in Akalpada land acquisition | अक्कलपाडा भूसंपादनात अक्षम्य चुका

अक्कलपाडा भूसंपादनात अक्षम्य चुका

Next

संडे हटके बातमी

साक्री : सिंचन विभागाचे अधिकारी व भूसंपादन अधिकाºयांच्या अक्षम्य चुकांमुळे अक्कलपाडा धरणाखाली गेलेल्या जमिनीचे मालक असलेल्या शेतकºयांना आपल्या जमिनी तर गमवाव्या लागल्या परंतु त्याचा मोबदला  घेण्यासाठी सुद्धा शासनापुढे भिकाºयासारखे हात पसरावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे़ अक्कलपाडा धरणाचा चुकीचा सर्वे झाल्याने संपादित न झालेल्या जमिनीमध्ये धरणाचे पाणी शिरले आहे, या जमिनीत आता पिक येणार नाहीत म्हणून त्या जमिनीचा मोबदला तरी द्यावा अशी मागणी धरणग्रस्त गावातील शेतकºयांनी केली आहे.
सन १९८४ च्या दशकात सुरू केलेले अक्कलपाडा धरणाची सुरुवातीची किम्मत साडेपाचशे कोटी रुपये होती़ वेळोवेळी धरणाची किंमत वाढत जाऊन दोन हजार कोटीपर्यंत या धरणाचा खर्च झाला आहे़ या धरणामुळे तामसवाडी, वसमार, सय्यदनगर या गावांच्या शेतजमिनी बुडाल्या़ ज्या शेतजमिनीवर शेतकºयांचे भवितव्य अवलंबून होते, ती जमीन व गावे सोडताना ग्रामस्थांना दु:ख अनावर झाले़ दुसºयांच्या भल्यासाठी शेतकºयांना त्याग करावा लागला़ हे कमी की काय जेव्हा धरणात प्रत्यक्षात ७० टक्के पाणी अडविण्यात आले, तेव्हा ग्रामस्थांना मोठा धक्का बसला़ ज्या जमिनी धरणासाठी संपादित झालेल्या नव्हत्या किंवा तेथपर्यंत धरणाच्या पाण्याची हद्द होती त्याच्याही पुढे पाणी शिरल्याने व ७० टक्के पाणी साठवल्यावरही परिस्थिती निर्माण झाली आहे़ जर पूर्ण क्षमतेने धरण भरले तर काय परिस्थिती निर्माण होईल? याची कल्पनाही शेतकरी करू शकत नाहीत. याचाच अर्थ धरणाच्या चुकीचा सर्वे झाला आहे किंवा सर्वे करणाºयांनी जाणून-बुजून चुकीचा सर्वे केला असल्याचा आरोप आता शेतकरी करू लागले आहेत़ ज्या जमिनी संपादित झाल्या नाहीत त्या जमिनीचा आजच्या बाजारभावानुसार मोबदला द्यावा अशी मागणी शेतकºयांनी केली आहे़ यावर्षी पांझरा नदीला महापूर आल्याने एका दिवसात धरण शंभर टक्के भरले़ जास्त पाण्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे    उघडावे लागले़ यामुळे धरणाखालील शेतकºयांचे, रस्त्यांची आणि पुलांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे़ शेतकºयांच्या म्हणण्यानुसार, पुरामुळे नुकसान झाले तर शासनाला कोट्यावधी रुपये भरपाई द्यावी लागते किंवा खर्च करावे लागतात़ शेतकºयांना ज्या अनमोल जमिनी धरणाखाली गेल्या आहेत त्याचा योग्य तो मोबदला का दिला जात नाही? यासाठी सिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावरही कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न पीडित     शेतकºयांकडून उपस्थित होत आहे़ धरण पूर्ण क्षमतेने भरले तर धरणाखालील आठ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे़ परंतु, धरणाचे काम अद्यापही अपूर्ण आहे़ न संपादित झालेल्या जमिनींचा मोबदला अद्यापही शेतकºयांना दिला गेलेला नाही़ यामुळे अक्कलपाडा धरणाचे घोंगडे भिजत पडले आहे़ याचा सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी आहे़
अनागोंदी कारभाराचा फटका
सन २०१७ मध्येच धरणाचे पाणी न संपादित झालेल्या जमिनी मध्ये घुसले होते़ तरीही सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी तसा अहवाल शासनाकडे का पाठवला नाही, हे एक मोठे कोडे आहे़ धरणाच्या महत्त्वाच्या बाबींवर तरतूद न करता आता धरणाचे डावे व उजव्या कालव्यांवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे़ हे एक मोठे आश्चर्य असल्याचे शेतकºयांनी म्हटले आहे़ 
सिंचन विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेणारे, सरकारला ही खरी परिस्थिती समजून येत नसल्याने सरकारलाच अंधारात ठेवणाºया अधिकाºयांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे़ शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येकडे त्वरित लक्ष घालून शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे़

Web Title: Unforced errors in Akalpada land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे