व्यापारावरील सेवाशुल्क वाढीला संघटनेचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 11:25 PM2019-12-07T23:25:44+5:302019-12-07T23:26:22+5:30
धुळे शासनाने उद्योजकांना विश्वासात न घेता चटई क्षेत्रातील दुप्पट तर सेवाशुल्कात पाच पटीने वाढ केली आहे़ यामुळे उद्योजकांना मोठा ...
धुळे शासनाने उद्योजकांना विश्वासात न घेता चटई क्षेत्रातील दुप्पट तर सेवाशुल्कात पाच पटीने वाढ केली आहे़ यामुळे उद्योजकांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे़ उद्योजकांवर अन्याय करणारा निर्णय रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन संघटनेतर्फे आमदार कुणाल पाटील यांना देण्यात आले़
आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर उद्योजक व औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता करण्यात आलेली सेवाशुल्क वाढ रद्द करावी़ धुळे व नरडाणा औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक करावी, धुळे औद्योगिक क्षेत्रासाठी आरक्षित असलेल्या अक्कलपाडा प्रकल्पातील पाणी शहरातील औद्योगिक वसाहतीला मिळावे यासाठी पाठविण्यात आलेला प्रस्ताव त्वरित मार्गी लावावा़ यासंदर्भात मुख्य अभियंता सोनजे यांचेशी संपर्क साधून प्रस्तावाची सद्यस्थिती जाणून घेत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी कटीबद्ध आहे़
या प्रकरणाची सर्व माहिती घेऊन उद्योजकांना दिलासा दिला व सेवाशुल्क वाढीचा प्रश्न, तसेच नरडाणा व धुळे एमआयडीसी प्रलंबित प्रश्न विधानसभेत मांडण्याचे आश्वासन आमदार कुणाल पाटील यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले़
यावेळी लघुउद्योग भारती, इंडस्ट्रीज मन्युफक्चरर्स असोसिएशन, अवधान मन्युफक्चरर्स असोसिएशन, स्पन पाईप्स मन्युफक्चरर्स असोसिएशन, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.