रक्तदान करुन अनोखे अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 09:24 PM2020-04-15T21:24:09+5:302020-04-15T21:24:34+5:30
चंदन नगर मित्र मंडळ : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती, महिलांनीही केले रक्तदान
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : चंदन नगर मित्र मंडळातर्फे अनोख्या पध्दतीने डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली़ कोरोना संकटामुळे जयंती उत्सव मिरवणूक न काढता घरात राहुनच अभिवादन करावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले होते़
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मंडळातर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले़ यावेळी १२९ रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचा संकल्प केला़ परंतु कीटअभावी केवळ ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले़ त्यात १६ महिला आणि ४९ पुरूषांचा समावेश आहे़ यावेळी लॉकडाउन व सोशल डिस्टेनसिंगचे पालन करण्यात आले. यासाठी चंदन नगर परिसरातील सर्व चौकांमध्ये लाऊड स्पिकर लावण्यात आले होते. रक्तदात्याचे नाव पुकारल्यानंतर संबंधित रक्तदाता एकटा येवून रक्तदान करीत होता़ रक्त संकलन करण्यासाठी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहकार्य लाभले. सायंकाळी सामूहिक बुद्धवंदना व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येवून राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.महेंद्रकुमार वाढे, सिद्धांत बागुल, अविनाश वाघ, अनिकेत बागुल, सुजाता मोरे, प्रसेनजित जगदेव, महेश अहिरे, शुभम नेरकर, अविनाश वाघ, किशोर सोनवणे, चेतन अहिरे, राहुल वाघ, राजेंद्र जाधव, सचिन ठोसर,भुमेश वाघ, अजिंक्य मोरे, संदिप पवार, जेतवन मोरे, दीपक जगदेव, चेतन आव्हारे, स्वप्नील चव्हाण, शत्रुघ्न शिंदे, सचिन वाघ, आकाश घोडे, रविराम जाधव, संदेश सोनवणे, रोहित अहिरे,अंकित अहिरे,रोहित झाल्टे, रोहित साबरे, मनोज शिंदे, अभिषेक अहिरे, अमोल चौधरी,आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कोरोनामुळे प्रबोधनपर देखावा मिरवणुकीची ४५ वर्षांची परंपरा खंडीत झाली़