मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रकचालकाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:17 PM2018-06-15T12:17:33+5:302018-06-15T12:43:31+5:30

सोनगीर ते बाभळे दरम्यान पहाटे घडला थरार : चालकाला मारहाण करत पैसेही लुटले

Unmanned murder of truck driver on Mumbai Agra Highway | मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रकचालकाची निर्घृण हत्या

मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रकचालकाची निर्घृण हत्या

Next
ठळक मुद्देसोनगीरनजीक महामार्गावर घडला थरार, ट्रक चालकाचा खूनवरिष्ठ पोलीस अधिका-यांची घटनास्थळी भेटशिंदखेडा पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु

धुळे : अज्ञात सहा ते सात जणांनी भरधाव कारने येत ट्रक थांबवून पैशांची मागणी करत ट्रकचालकाच्या गुप्तांगावर मारहाण केल्याने त्यात त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या बाभळे ते सोनगीर दरम्यान शुक्रवारी पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ यात सहचालक जखमी झाला आहे. दरम्यान, मारहाण करणारे कारसह फरार झाले आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी भेट दिली़ शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

टीएन ६७ एजे ९०७२ क्रमांकाचा ट्रक दिल्लीहून तामिळनाडूकडे जात होता़ मुंबई आग्रा महामार्गावर सोनगीरपासून अलिकडे ५ ते ६ किमी अंतरावर मागून येणा-या भरधाव कारने आलेल्या ६ ते ७ जणांनी या ट्रकला थांबविले. धारदार शस्त्राचा धाक दाखवून ट्रकचालकाकडे पैशांची मागणी केली़ पैसे देण्यास त्याच्याकडून नकार मिळाल्याने त्याला जबर मारहाण करण्यात आली़ यात अय्यप्पा विदा स्वामी (५२, तामिळनाडू) याच्या गुप्तांगाला जबर मार लागला. यात सहचालक कवीयारसन गुरुमूर्ती हा देखील जखमी झाला. मारहाण केल्यानंतर मारेकरी कारसह घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. घटनेनंतर सहचालक गुरुमुर्ती याने चालक विदा स्वामी यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले़ उपचार सुरु असताना शुक्रवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास विदा स्वामी यांचे निधन झाल्याचे डॉ़ महेंद्र धनवे यांनी घोषित केले. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु आहे. 

Web Title: Unmanned murder of truck driver on Mumbai Agra Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.