अनावश्यक पाण्याचे साठे केले रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:00 PM2019-07-20T12:00:56+5:302019-07-20T12:01:12+5:30
महापालिका : नेहरू नगरापासुन राबविली मोहिम
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पावसाळयात विविध साथीचे आजार उद्भवू नये. संभाव्य साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी उपाय योजना करण्यासाठी मनपातर्फे शहरात मोहिम राबविण्यात येत आह़े़
दरवर्षी नागरिकांना पावसाळ्यात साथीच्या आजाराला सामोरे जावे लागते़ यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचा गुरूवारी आढावा बैठक घेऊन योग्य उपाय-योजना करण्याचे निर्णय घेण्यात आला़ साथीचे आजाराविषयी जनजागृती होण्यासाठी शुक्रवारी नेहरू चौकातील दवाखाना परिसरात महापौर चंद्रकांत सोनार यांनी प्रभागातील नागरिकांची संवाद साधत डेंग्यू व साथीच्या रोगांबाबत नागरिकांना माहिती देऊन अॅबेटिंग व फवारणी, धुरळणीचे प्रात्याक्षिक करून दाखविली़ डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते.
त्यामुळे घरातील व घराजवळील अनावश्यक पाण्याचे साठे रिकामे करावे. घराची व परिसराची स्वच्छता ठेवावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.