धुळ्यात योग दिनाचा अपूर्व उत्साह..
By admin | Published: June 21, 2017 05:48 PM2017-06-21T17:48:03+5:302017-06-21T17:48:03+5:30
जिल्हाभरात शाळा व विविध संस्थातर्फे कार्यक्रम; तज्ज्ञांनी दिले हजारो नागरिकांना योगाभ्यासाचे धडे!
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.21 : जागतिक योग दिनानिमित्त धुळे शहरासह जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालये व विविध संस्थातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांद्वारे हजारो नागरिकांना बुधवारी योगाभ्यासाचे धडे देण्यात आले.
योगपटू योगेश्वरी मिस्त्री यांची उपस्थिती
भारत स्वाभिमान न्यासतर्फे एसआरपी मैदानावर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जागतिक योगपटू योगेश्वरी मिस्त्री यांची उपस्थिती होती. त्यांनी येथे उपस्थित तीन हजाराहून अधिक स्त्री, पुरुष, मुलांना योगाभ्यासाचे धडे दिले. पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योग दिन साजरा झाला. याप्रसंगी योग विद्याधामचे योग शिक्षक विजय जाधव व सुरेखा जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्जवालन झाले.
न्यू इंग्लिश स्कूल, वाडीभोकररोड येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका पी. एन. पाटील होत्या. योग शिक्षिका मनीषा जाधव, निखिल जाधव यांनी विद्याथ्र्याना ताडासन, वज्रासन, भुजंगासन, प्राणायाम असे विविध प्रकारचे आसनांचे प्रात्यक्षिक दाखविले. परिवर्तन प्राथमिक माध्यमिक विद्यालयात कार्यक्रम झाला. योगशिक्षक मधुकर माळी व योग शिक्षक नितीन सोनवणे यांनी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा:यांना योगासन व प्राणायामाचे महत्व सांगितले. एस. आर. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शोभा ठाकरे व प्रज्ञा ठाकरे यांनी योगासने व प्राणायम शिकविले.