‘खिशाला उलटा ङोंडा’ने नामुष्की
By admin | Published: January 28, 2017 12:27 AM2017-01-28T00:27:07+5:302017-01-28T00:27:07+5:30
महापालिकेतील ध्वजवंदन : प्रकरणाची चौकशी करणार
धुळे : प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या आवारात ध्वजवंदनावेळी काही अधिकारी आणि नगरसेवकांनी आपल्या खिशाला उलटा ङोंेडा लावला असल्याचा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला आह़े त्याची चौकशी केली जाईल, असे साहाय्यक आयुक्त अनुप डुरे यांनी सांगितले. उलटा ङोंडा लावणा:यांमध्ये साहाय्यक आयुक्त त्र्यंबक कांबळे, विरोधी पक्षनेते गंगाधर माळी, स्वीकृत नगरसेवक प्रशांत श्रीखंडे यांचा समावेश आह़े
ध्वजवंदनासाठी गुरुवारी सकाळी महापालिकेत सर्व लोकप्रतिनिधींसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होत़े कार्यक्रमाच्या आरंभी त्यांच्या खिशाला ङोंडा लावण्यात आला़ पण तो उलटा लावला असल्याने हा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून तत्काळ व्हायरल झाला़
दरम्यान, यासंदर्भात त्र्यंबक कांबळे, प्रशांत श्रीखंडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही़ त्यामुळे त्यांचीही भूमिका स्पष्ट होऊ शकलेली नाही़
शुक्रवारी महापालिकेत आयुक्त, उपायुक्तासह जवळपास सर्वच प्रमुख अधिकारी कार्यालयीन कामकाज किंवा रजेवर असल्याने त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रय} केला. परंतु होऊ शकला नसल्याने यासंदर्भात त्यांचीही भूमिका स्पष्ट झालेली नाही.
महापालिकेत ध्वजवंदनाच्या कार्यक्रमास मला येण्यास थोडा उशीर झाला़ घाईघाईत येथे पोहचलो़ एका कर्मचा:याने माङया खिशाला ङोंडा लावला़ तो उलटा लावला गेल्याचे नंतर लक्षात आल़े ही बाब लक्षात येताच ङोंडा सरळ केला़ ही चूक अनावधानाने झाली आह़े
- गंगाधर माळी, विरोधी पक्षनेता, महापालिका
महापालिकेत आयोजित करण्यात आलेल्या ङोंडावंदन कार्यक्रमाला काही अधिकारी आणि नगरसेवक यांनी खिशाला उलटा ङोंडा लावल्याच्या प्रकरणाबाबत चौकशी केली जाईल़ -अनुप डुरे,
साहाय्यक आयुक्त