उत्कर्ष कॉलनीत तरुणाने घेतली बाथरुममध्ये फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 09:09 PM2020-07-27T21:09:51+5:302020-07-27T21:10:11+5:30

कॉलनी परिसरात व्यक्त झाली हळहळ

In Utkarsh Colony, a young man was hanged in the bathroom | उत्कर्ष कॉलनीत तरुणाने घेतली बाथरुममध्ये फाशी

उत्कर्ष कॉलनीत तरुणाने घेतली बाथरुममध्ये फाशी

Next

धुळे : साक्री रोडवरील उत्कर्ष कॉलनीत तरुणाने राहत्या घरी बाथरुममध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली़ ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली़
रोहित नाना भोसले (२३) असे त्या तरुणाचे नाव आहे़ सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास रोहित याच्या पोटात दुखत असल्याने तो शौचालयासाठी झोपेतून उठला़ किचनरुमजवळ असलेल्या बाथरुममध्ये तो गेला़ घरातील आजीने त्याला जाताना पाहीले़ पण, अर्धा तासाहून अधिक वेळ होऊनही तो परत आला नाही़ म्हणून आजीने इतराना आवाज दिला़ बाथरुमजवळ जावून रोहितला आवाज देण्यात आला़ मात्र, त्याने काहीही उत्तर दिले नाही़ आवाज देवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला़ आतमध्ये पाहीले असता रोहितने बाथरुमच्या खिडकीला असलेल्या एका आडव्या सळईला साडी बांधून पाय मागच्या बाजुला वाकवून गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला़ त्याला घरच्या लोकांच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले़ डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: In Utkarsh Colony, a young man was hanged in the bathroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे