जिल्ह्यात १,२६१ केंद्रावर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:35 AM2019-03-10T11:35:39+5:302019-03-10T11:36:17+5:30

आज पल्स पोलिओ मोहीम : १ लाख ८७ हजार ८१२ बालकांना देणार लस

Vaccination will be done at 1,261 centers in the district | जिल्ह्यात १,२६१ केंद्रावर होणार लसीकरण

dhule

Next

धुळे : राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन कार्यक्रमांतर्गत १० मार्च रोजी धुळे जिल्ह्यातील १ हजार २६१ लसीकरण केंद्रांवर पाच वर्षांच्या आतील १ लाख ८७ हजार ८१२ बालकांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. पालकांनी पाच वर्षांच्या आतील बालकांना डोस द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
पल्स पोलिओ या मोहिमे संदर्भात जिल्हा समन्वयक समितीची बैठक जिल्हाधिकारी रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी. उपस्थित होते.
चारही तालुक्यांना त्यांचे लसीकरण बूथ, लाभार्थी, घरभेटीचे पथक, ट्रान्झिट टीम, मोबाईल टीमनुसार अनुदान वितरीत करण्यात आले आहे. पोलिओचे डोस देण्यासाठी बायव्हायलेट पोलिओ लस ३ लाख ६० हजार प्राप्त झाली आहे.
बसस्थानक, रेल्वे स्थानक, ऊस तोड कामगार, वीटभट्टी कामगार, रोड कामगार, बाजार, यात्रा या ठिकाणी बालकांना लस देण्यासाठी ट्रान्झिट व मोबाईल पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्यक्ष बूथवर डोस देणे, बालकांना बोलावून आणण्यासाठी ३हजार ३३९ कर्मचारी नियुक्त असतील. २४५ अधिकारी व कर्मचारी पर्यवेक्षण करतील. तसेच चारही तालुक्यांच्या पर्यवेक्षणासाठी ८ अधिकारी व २५ जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बसस्थानक, रेल्वे स्थानक, तपासणी नाके येथे ६९ ट्रान्झिट पथके कार्यरत असतील. भटके कामगार, वीटभट्टी, ऊसतोड, रोड कामगारांच्या बालकांसाठी ८६ मोबाईल पथके कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार तालुका अधिकारी व ८२ वैद्यकीय अधिकारी या मोहिमेचे नियोजन करीत आहेत.

Web Title: Vaccination will be done at 1,261 centers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे