स्काऊट-गाईड चिंतन दिनानिमित्त धुळ्यात विविध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:16 PM2018-02-25T12:16:34+5:302018-02-25T12:21:11+5:30
उपक्रम : स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांचा हस्ते सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळे भारत स्काऊटस आणि गाईडस जिल्हा संस्थेतर्फे चिंतन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने स्काऊट गाईडच्या जिल्हा कार्यालयात ध्वजारोहण, सर्वधर्मीय प्रार्थना, वक्तृत्व व रंगभरण स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या.
या स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे (माध्यमिक), जिल्हा संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षक आमदार जे. यू. ठाकरे, स्काऊटचे जिल्हा मुख्य आयुक्त शांताराम शेंडे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त बी. जे. रायते, जिल्हा खजिनदार सलीम अन्सारी, जिल्हा संघटक संतोष सोनवणे, जिल्हा मुख्यालय आयुक्त गणेश फुलपगारे, जिल्हा सरचिटणीस मनीषा पवार, जिल्हा साहाय्यक आयुक्त आर. बी. भामरे, आर. डी. वर्मा, जिल्हा साहाय्यक आयुक्त एम. पी. देवपूरकर, मेधा कुलकर्णी, सवीता पांडे, एम. जी. वळवी, सुनीता भामरे, अर्जुन जाधव, किरण ईशी, सोनू बोरसे, लक्ष्मी कोकणी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना चिंतन दिनाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे, असे आवाहन येथे उपस्थित विद्यार्थ्यांना करण्यात आले. सूत्रसंचालन संतोष सोनवणे यांनी केले. आभार गणेश फुलपगारे यांनी मानले.