विद्यावर्धिनीत विविध स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 10:16 PM2019-09-20T22:16:58+5:302019-09-20T22:17:33+5:30
विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी : शिक्षक दिन, गणेशोत्सवानिमित्त घेतल्या स्पर्धा
धुळे : विद्यावर्धिनी महाविद्यालयात शिक्षक दिन व गणेशोत्सवानिमित्त सायकल, मेहंदी, पाककला आदी स्पर्धाचें आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.
स्पर्धा व त्यातील अनुक्रमे प्रथम, द्वितीव व तृतीय विजेते पुढील प्रमाणे- सायकल स्पर्धा- पंकज विजय बोरसे, कविता नरेंद्र कुंवर, सोनू ज्ञानेश्वर मिस्तरी. पाककला- नेहा अरूण गवळी, पल्लवी तात्या मोरे, पंकज विजय बोरसे, उत्तेजनार्थ भूषण मनोहर पाटील. चित्रकला- अमिषा दिलीप वळवी, दीक्षा अरूण मुजगे, प्रेरणा सुरेश कुंवर, उत्तेजनार्थ निकीता नरेश वाघ. महेंदी- पल्लवी नितीन वाघ, दीपिका ग्यानचंदानी, करिष्मा बापू कुंवर, उत्तेजनार्थ गीतावती तुमड्या तडवी. तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत ११ वी विज्ञान शाखेच्या वर्गाने विजेतेपद पटकावले.
परीक्षक म्हणून डॉ. पुष्पा गावीत, प्रा. निलेश पाटील, प्रा. वंदना चौधरी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. बबीता वाडीले यांनी तर आभार प्रा. उज्वला जाधव यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. मयूर बारी, प्रा. अमित बडगुजर, प्रा. मनोहर ठाकरे, प्रल्हाद पाटील यांनी परिश्रम घेतले.