जिल्हाभरात विविध कार्यक्रम : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:51 PM2019-04-18T12:51:27+5:302019-04-18T12:52:39+5:30
तहाडी येथे डॉ.आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना सरपंच जयश्री पाकळे. उपस्थित उपसरपंच गणेश भामरे, प्रफुल्ल पाटील, उजनबाई ...
तहाडी येथे डॉ.आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना सरपंच जयश्री पाकळे. उपस्थित उपसरपंच गणेश भामरे, प्रफुल्ल पाटील, उजनबाई अहिरे, सुनील पाकळे, सुदाम भलकार, डी.बी. अहिरे, के.डी. अहिरे आदी.तºहाडी येथे डॉ.आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना सरपंच जयश्री पाकळे. उपस्थित उपसरपंच गणेश भामरे, प्रफुल्ल पाटील, उजनबाई अहिरे, सुनील पाकळे, सुदाम भलकार, डी.बी. अहिरे, के.डी. अहिरे आदी.
धुळे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात विविध उपक्रमांचे आयोजन करुन अभिवादन करण्यात आले. संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालयातर्फे प्रतिमापूजन करण्यात आले.
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान
शिरपूर- शहरातील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानामधील डॉ़आंबेडकर यांच्या पुतळ्यास भाजपातर्फे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष रमेश वसावे, अनु.जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, कुउबा समिती संचालक चंद्रकांत पाटील, आबा धाकड, शहराध्यक्ष हेमंत पाटील, महेंद्र पाटील, मुबीन शेख, राधेश्याम भोई, अविनाश शिंपी, बापु लोहार, रविंद्र भोई, शानाभाऊ राजपुत, रविंद्र सोनार, संभाजी पाटील, नंदु माळी, जयवंत सरदार आदी उपस्थित होते़
कापडणे येथे उपक्रम
कापडणे- येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमापूजन करण्यात आले. यावर्षी मिरवणूक न काढता प्रतिमापूजन करून पुलवामा घटनेतील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी सरपंच भटू पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष नवल पाटील, उपसरपंच भैय्या पाटील, माजी उपसरपंच भैया बोरसे, मनोज पाटील, प्रा.डॉ. प्रकाश भामरे, ग्रा.पं. सदस्य महेंद्र भामरे, भटू पाटील, अमोल बोरसे, बालू पाटील, विनोद भामरे, संतोष भामरे, सचिन भामरे, संदीप ब्राह्मणे आदी उपस्थित होते.
तºहाडी येथे विविध कार्यक्रम
तºहाडी- सरपंच जयश्री पाकळे यांच्याहस्ते डॉ.आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच गणेश भामरे, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, उजनबाई अहिरे, सुनील पाकळे, माजी सरपंच सुदाम भलकार, निवृत्त शिक्षणाधिकारी डी.बी अहिरे, के.डी. अहिरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
तºहाडी विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष सुधीर भामरे, मुख्याध्यापक एन.एच. कश्यप यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक डी.बी. पाटील, सुभाष भामरे, ए.एम. सोनवणे, डी.एस. मोरे, ए.के. पाटील, रावसाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.
निमगुळ येथे अभिवादन
निमगुळ येथील राजवाडा चौकात विविध पक्ष, संघटनांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सयाजीराव बागल, सरपंच बापू सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव बागल, उपसरपंच सुपाबाई साळवे, माजी उपसरपंच दीपक बागल, गटनेते डॉ.वीरेंद्र बागल, हितेंद्र बागल, नंदलाल बागल, ग्रामसेवक बोरसे, हरी कुवर, अॅड.जगदीश कुवर, संदीप बैसाणे, युवराज बागल आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी हिंमत बैसाणे, संजय साळवे, भगवान साळवे, विजय साळवे, कैलास साळवे, किरण साळवे, मुकेश भामरे, पदमाकर साळवे, विनोद साळवे, मिलिंद साळवे, सुरेश गुलाले, अनिता साळवे, जिजाबाई भामरे, लताबाई साळवे, कमलबाई साळवे, मंगलाबाई साळवे, सखुबाई चित्ते, राधाबाई साळवे, अरुणाबाई साळवे, सुरेखा साळवे, संजय साळवे, सरलाबाई राजेंद्र साळवे, सारिका साळवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटनेते राजेंद्र साळवे यांनी केले.
साक्रीरोड परिसरातून रॅली
धुळे- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साक्रीरोड परिसरातून जल्लोषात रॅली काढण्यात आली. सकाळी ८ वाजता कृषीनगर, साक्रीरोड, लुंबीनीविहार परिसर, महिंदळे शिवार, मोगलाई, पद्मनाभ नगर तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक सिंचन भवन येथे जमा झाले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात आला, अशी माहिती सेवानिवृत्त कृषी अधिकारी बी.यू. वाघ यांनी दिली.