वासखेडी जि.प.शाळेस सौरकीट भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:03 PM2019-03-02T23:03:20+5:302019-03-02T23:03:36+5:30

लोकप्रतिनिधीचे औदार्य : राज्यात जिल्ह्याचा अव्वल नंबर, हर्षल विभांडिक यांची माहिती

VaSheddi District Shop visit to Solariket | वासखेडी जि.प.शाळेस सौरकीट भेट

dhule

googlenewsNext

साक्री : तालुक्यातील माळमाथा परिसरातील वासखेडी जिल्हा परिषद शाळेला सौर कीट भेट म्हणून देण्यात आले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सौजन्याने व माजी आमदार कै.उतमराव जिभाऊ पाटील नांद्रे यांच्या स्मरणार्थ पं.स.सदस्य उत्पल नांद्रे यांनी यासाठी पुढाकार घेतला.
पं.स. सभापती गणपत सदा चौरे व जिल्हा परिषद सदस्या उषाताई ठाकरे यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. अध्यक्षस्थानी धूळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते तर प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. सदस्य उत्पल नांद्रे, वासुदेव बदामे, प्रा.रविंद्र ठाकरे, हर्षल विभांडीक, प्रकाश बच्छाव, डॉ महेश ठाकरे, रघुवीर खारकर, ताहीरबेग मिर्झा, केंद्रप्रमुख अहिरे , शोभा देसले, शंकरजी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रविंद्र कुवर, जितेंद्र दहीते, पावबा बच्छाव, दिपक मोरे, विजय न्याहळदे किरण बेडसे, विनोद पाटील, राजू नांद्रे, जितेंद्र शिंदे, व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवराचे मुख्याध्यापिका संगीता पाटील याच्या हस्ते ग्रंथ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. गावातील देणगीदार सरपंच पंडित वारु, उपसरपंच जितेंद्र शिंदे, जगदिश सावळे, रविंद्र साळुंके, वेडु जाधव, प्राचार्य संजय शिंदे , प्रगती फाउंडेशनचे डॉ. रवींद्र ठाकरे. गणपत चौरे, हर्षल विभांडीक, कवी रावसाहेब कुवर, संगिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हर्षवर्धन दहिते मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आम्ही जिल्ह्यात हर्षल विभांडीक यांच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्थेच्या मदतीने जिल्ह्यातील १२० शाळांना सौरकिट दिले आहेत. आणि जुन महिन्यात सुमारे २५० शाळांना कार्यक्रम घेवून सौर किट वाटप करणार आहोत. हर्षल विभांडीक म्हणाले की आम्ही दर शनिवारी अमेरिकेतील विद्यार्थ्यांना जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद घडवतो. यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच धुळे जिल्ह्यात संपूर्ण शाळा डिजिटल झाल्याने राज्यात अव्वल नंबर लागतो.
सुत्रसंचालन प्रा.डॉ.सुधाकर जाधव यांनी तर आभार सुभाष पगारे यांनी मानले. मुख्याध्यापिका संगीता पाटील, सुभाष पगारे, केवबा बच्छाव, संगिता साळुंके व बी.डी.कुवर, वैभव देवरे, गवळी शाळेतील व शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.

Web Title: VaSheddi District Shop visit to Solariket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे