शहरात वाढत्या तापमानामुळे पालेभाज्यांचे दर कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 10:23 PM2019-04-09T22:23:00+5:302019-04-09T22:23:51+5:30
्रफटका : आणखी महिनाभर भाज्याचे भाव स्थिर राहण्याचा अंदाज
धुळे : उन्हाचा पारा वाढू लागल्याने फळासह विविध भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसत आहे़
दररोज ३०-३५ गाड्यांची आवक
धुळे शहरात सोनगीर, कापडणे, मनमाड, नंदगाव, नाशिक, चांदवड या परिसरातून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. येथील कृउबात दररोज ३० ते ३५ गाड्यांची भाज्यांची आवक होत असते. हिवाळा लागताच ग्राहकांकडून मेथी, पोकळा, वांगे, पालक, यासारख्या पालेभाज्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र यावर्षी मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने, ग्राहकांना अपेक्षित भाज्या मिळू शकत नाही. गेल्या दोन-चार दिवसात तर पालक, दोडके, कांदापात याची आवकच झालेली नाही. मागणी आणि पुरवठ्याचे गणित बसत नसल्याने, भाज्यांचे दर वाढले आहेत.अजून किमान महिनाभर ही परिस्थिती राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.