सोनगीरजवळ धुळे पोलिसांचे वाहन उलटले, पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:51 AM2017-12-08T11:51:42+5:302017-12-08T11:55:14+5:30
शिंदखेडा बंदोबस्तासाठी जात असताना घडला अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे/सोनगीर : शिंदखेडा नगरपंचायती प्रचार सभेच्या बंदोबस्तासाठी जात असलेले धुळे पोलिसांचे वाहन उलटून झालेल्या अपघातात पाच पोलीस किरकोळ जखमी झाले़ हा अपघात दोंडाईचा - सोनगीर रस्त्यावरील सोमेश्वर मंदिराजवळ आज सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास घडला़ जखमी पोलिसांवर सोनगीर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत़
शिंदखेडा नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या आज वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारसभा आहेत़ त्या अनुषंगाने बंदोबस्तासाठी पोलीस एमएच १८ जी ०२५७ क्रमांकाच्या वाहनाने धुळ्याकडून शिंदखेडाकडे जात होते़ सोनगीर ते दोंडाईचा रोडवर सोमेश्वर मंदिराजवळ हे वाहन जात असताना त्याचवेळेस नंदूरबारकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने येणाºया ट्रकने पोलीस वाहनाला कट मारला़ अपघात होऊ नये यासाठी पोलिसांनी वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले़ राज्य महामार्गाचे काम सुरु असल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या खडीच्या ढिगाºयावर पोलिसांचे वाहन गेल्याने ते उलटले आणि रस्त्याच्या बाजूला खड्यात पडले़ अपघात होताच चालक वाहनासह फरार झाला़
या अपघातात धुळ्याचे पोलीस उपनिरीक्षक सी़ डी़ शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल ए़ डी़ ईशी, आऱ के़ मोरे, बी़ ओ़ चव्हाण, एस़ एच़ पोटगिर जखमी झाले आहेत़ त्यांना उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, या वाहनात बॉम्बशोधक निकामी करण्याचे साहित्य होते़ या अपघातामुळे या साहित्याचे नुकसान झाले का, हे तपासले जात आहे़