VIDEO: तापी पुलावरून लक्झरी बस पाण्यात पडल्याचा अंदाज; शोध मोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 08:43 AM2020-08-28T08:43:02+5:302020-08-28T08:43:39+5:30
नदी पुलाचा कठडा तोडून वाहन पाण्यात; लक्झरी बस असल्याची भीती
- सुनिल साळुंखे
शिरपूर - धुळ्याकडून शिरपूरकडे भल्या पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने येणारे अज्ञात वाहन मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे पुलावरून पाण्यात पडल्याची दुर्दैवी घटना पुन्हा घडली. सदर वाहन नेमके कोणते ते समजू शकले नसले तरी लक्झरी बस असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आज पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास हे वाहन धुळ्याकडून येत असताना सदर चालकाला डुलकी लागल्यामुळे तापी पुलाचे कठडे तोडून ते वाहन पाण्यात पडले. सदरचे वृत्त महामार्ग पोलिसांना कळताच त्यांनी लागलीच घटनास्थळी येत पहारा ठेवला आहे़. मात्र तापी नदी दुथडी भरून वाहत असल्याने अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.प रंतु पुलाचे कठडे मोठ्या प्रमाणावर तुटल्यामुळे मोठे वाहन असल्याचा अंदाज केला जात आहे़.