लाखो रूपयांची वाहने भंगारात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:29 PM2020-10-08T13:29:05+5:302020-10-08T13:29:22+5:30

शिरपूर : लिलावाअभावी जागीच जंगली वाहने, अधिकाऱ्यांचय दुर्लक्षामुळे शासनाच्या महसुलावर पाणी

Vehicles worth lakhs of rupees are wrecked | लाखो रूपयांची वाहने भंगारात पडून

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शहरातील पाटबंधारे कार्यालयात अनेक महिन्यांपासून २ वाहने भंगारात आहेत़ लिलावाच्या प्रतिक्षेतच ही वाहने जागीच गंजल्याची वस्तुस्थिती आहे़ ‘लोकमत’ने केलेल्या पहाणीत ही वस्तूस्थिती दिसून आले.
शासनाचे विविध विभाग नागरिकांसाठी कार्यरत असतात़ नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पोलिस, आरोग्य, बांधकाम विभाग, एसटी यांचा थेट नागरिकांशी संपर्क येत असतो़ ही वाहने कालबाह्य ठरल्यानंतर त्यांची जागा नवी वाहने घेत असतात़ अनेकदा कालबाह्य झालेली वाहने मोडीत न काढता संपूर्ण सडेपर्यंत तशीच ठेवली जातात व नंतर भंगारात विक्री केली जाते़ तोपर्यंत त्या वाहनांसाठी जागा मात्र मोठ्या प्रमाणात अडकून पडते़
सरकारी नियमानुसार कोणतेही वाहन १५ वर्ष वापरण्याचा नियम असतांना ७-८ वर्षातच ही वाहने खराब कशी झाली? ही वाहने मोडीत काढण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी परवानगी आवश्यक आहे़जुन्या गाड्या दुरूस्त न करताच नवीन वाहने खरेदी करण्याकडे अधिकाऱ्यांचा कल दिसतो़ या गाड्यांऐवजी बाजारातील अनेक अद्ययावत वाहने भाड्याने लावण्यात आली आहेत़ वाहने जुनी झाल्याने ती वापरण्यासाठी अनेक अधिकारी व पदाधिकाºयांनी नाकारल्याने शासकीय वाहने पडून आहेत़ बहुतांशी अधिकारी शासकीय गाडी न वापरता खाजगी गाडी वापरत आहेत़ त्यामुळे शासकीय वाहने पडून खराब होत आहेत़
येथील पाटबंधारे विभागाच्या आवारात उभ्या असलेल्या दोन्हीं वाहनाला निसर्गाने हिरवागार श्रृंगार केला आहे़ सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग आदी अनेक कार्यालयांच्या आवारात भंगार वाहने पडून आहेत.निकामी आणि मुदत संपलेल्या या वाहनांचा वेळीच लिलाव झाला असता तर शासनाला यातून महसूल प्राप्त झाला असता़ मात्र, संबंधित वरिष्ठ अधिकाºयांची अनास्था याला कारणीभूत ठरली आहे़ अधिकारी व कर्मचाºयांचा तर येथे मेळच नाही़ त्यामुळे शेतकºयांना इकडे फिरून काहीच कळत नाही़

Web Title: Vehicles worth lakhs of rupees are wrecked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.