गांडूळ खत प्रकल्प दोन वर्षानंतर अखेर सुरू!
By admin | Published: January 18, 2017 12:09 AM2017-01-18T00:09:48+5:302017-01-18T00:09:48+5:30
मनपा : शहर स्वच्छतेची पाहणी करणार केंद्रीय समिती, गुणांकन वाढविण्याचे प्रयत्न
धुळे : शहरातील वरखेडी रोडवर असलेला मनपाचा गांडूळ खत प्रकल्प तब्बल दोन वर्षानंतर अखेर सुरू करण्यात आला आह़े शहर स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय समिती दाखल होणार असल्याने मनपा प्रशासनाने प्रकल्प सुरू केला असून त्यामुळे मनपाला मिळणा:या गुणांकनात भर पडणार आह़े
स्वच्छ सव्रेक्षण 2017 अंतर्गत शहरात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे गुणांकन करण्यासाठी 20 जानेवारीला केंद्रीय समिती धुळय़ात दाखल होणार आह़े त्यामुळे मनपातर्फे स्वच्छताविषयक सर्व उपाययोजनांवर भर दिला जात आह़े त्याचाच भाग म्हणून वरखेडी रोडवरील गांडूळ खत प्रकल्प सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत़ मात्र सदर प्रकल्पाचे वीज बिल थकल्याने त्याचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता़ त्यामुळे प्रकल्प सुरू करण्यात अडचणी निर्माण होत होत्या़ अखेर मनपाने वीज बिलापोटी 38 हजार रुपयांची रक्कम भरल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आह़े त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या यंत्रांच्या जळालेल्या मोटारीदेखील बदलण्यात येऊन प्रकल्प सुरू करण्यात आला आह़े त्याचप्रमाणे या प्रकल्पात दोन वर्षापूर्वीचे खत पडून आह़े सदर खताची विक्री करण्यात आलेली नसली तरी आता या खताला मागणी आली असून खताची विक्री केली जाणार आह़े तसेच कच:याचे विघटन करण्यासाठी गांडूळ खतदेखील उपलब्ध असल्याचे मनपा सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आल़े स्वच्छ सव्रेक्षणात कचरा संकलन व प्रक्रियेला गुण दिले जाणार असल्याने मनपाने कच:यावर प्रक्रिया सुरू केली असून त्यामुळे गुणांकात निश्चितपणे भर पडेल असा विश्वास प्रशासनाला आह़े मात्र गांडूळ खत प्रकल्पात तयार केलेल्या खताची विक्री न झाल्यास हा प्रकल्प तोटय़ात चालविण्याची नामुष्की मनपावर येऊ शकत़े
दर महिन्याला साधारणपणे 15 हजारांचे वीज बिल मनपाला भरावे लागणार आह़े