पहिल्याच दिवशी 318 उमेदवारांची दांडी

By admin | Published: March 22, 2017 11:57 PM2017-03-22T23:57:39+5:302017-03-22T23:57:39+5:30

धुळे : शहरात पोलीस व एसआपीएफसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आह़े

On the very first day 318 candidates of Dandi | पहिल्याच दिवशी 318 उमेदवारांची दांडी

पहिल्याच दिवशी 318 उमेदवारांची दांडी

Next


धुळे : शहरात पोलीस व एसआपीएफसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आह़े दररोज 700 उमेदवारांना बोलविण्यात आले आहेत़ त्यात पहिल्याच दिवशी पोलीस भरतीसाठी 179, तर एसआरपीएफला 139 असे एकूण 318 उमेदवार गैरहजर राहिले आहेत़
जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या 46 जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने एकूण 7 हजार 901 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत़ त्यात पुरुष 6 हजार 907 व महिलांचे 994 अर्ज आहेत़ पोलीस कवायत मैदानावर भरती प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली़ त्यात 700 उमेदवारांना शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात आले होत़े त्यापैकी 551 उमेदवार हजर होत़े, तर 179 गैरहजर होत़े  उंचीमध्ये 37, छातीमध्ये 17 उमेदवार अपात्र ठरल़े 467 उमेदवारांना चेस्ट नंबर वाटप करण्यात आल़े भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना मिळालेले गुण त्याच ठिकाणी दाखविण्यात येत आहेत़ भरतीची व्हिडिओ रेकॉडिंग करण्यात येत आह़े मैदानावर एकूण 25 व्हिडिओ कॅमेरे फोटोग्राफरसह कार्यरत आहेत़ 
तसेच 8 सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले आहेत़ उमेदवारांसाठी वैद्यकीय पथकाची नेमणूक करण्यात आली आह़े दहा-दहा उमेदवारांचे गट तयार करून त्यांना मैदानी चाचणीसाठी पाठविण्यात येत आह़े 100 मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी, पुलप्स  या मैदानी चाचण्या दुपारी एक वाजेच्या आत पूर्ण करण्यात येत आह़े तर उमेदवारांची 1600 मीटर धावण्याची चाचणी उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारी साडेचारनंतर करण्यात येत आह़े त्यासाठी मैदानावर लाईटची व्यवस्था करण्यात आली आह़े भरती प्रक्रियेवर पोलीस अधीक्षक चैतन्या एस., अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व पोलीस उपअधीक्षक देवीदास गवळी हे लक्ष ठेवून आहेत़
एसआरपीएफला मैदानी चाचणीत 443 उमेदवार पात्र
राज्य राखीव पोलीस बल गट क्र 6 (एसआरपीएफ)च्या 56 जागांसाठी एकूण 15 हजार 475 अर्ज आले आहेत़ एसआरपीएफसाठीही बुधवारपासून भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला़ त्यात दररोज 700 उमेदवारांना बोलविण्यात आले आह़े बुधवारी 561 उमेदवार हजर होते, तर 139 गैरहजर होत़े हजर उमेदवारांची 100 मीटर धावणे, लांब उडी, 5 कि़मी. धावणे ही मैदानी चाचणी घेण्यात येत आह़े त्यात 5 कि़मी. धावणे ही चाचणी गोंदूर रोडवर घेण्यात आली़ पहिल्या दिवशी मैदानी चाचणीत 443 उमेदवार पात्र ठरले असून 25 दिवस ही भरती प्रक्रिया सुरू राहील, अशी माहिती एसआरपीएफचे समादेशक श्यामराव दिघावकर यांनी दिली़

Web Title: On the very first day 318 candidates of Dandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.