ज्येष्ठ लेखिका डॉ. हेमा जावडेकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 10:02 PM2021-05-26T22:02:26+5:302021-05-26T22:02:54+5:30
डॅा. हेमा जावडेकर यांनी अमृता प्रितम, हरीवंशराय बच्चन, महादेवी वर्मा यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय किर्तीच्या साहित्तिकांच्या ग्रंथाचे अनुवाद केले होते. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १० पुस्तकांचे मराठीतून हिंदीत भाषांतर केले होते.
धुळे-हिंदीच्या प्रख्यात ज्येष्ठ लेखिका व अखिल भारतीय साहित्य अकादमीचा पुरस्कारप्राप्त डॅा. हेमा लक्ष्मण जावडेकर (८२) यांचे बुधवारी दुपारी २ वाजता निधन झाले.
डॅा. हेमा जावडेकर यांनी अमृता प्रितम, हरीवंशराय बच्चन, महादेवी वर्मा यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय किर्तीच्या साहित्तिकांच्या ग्रंथाचे अनुवाद केले होते. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १० पुस्तकांचे मराठीतून हिंदीत भाषांतर केले होते.त्यांना अखिल भारतीय साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला होता. तसेच धुळ्याच्या कानुश्री प्रतिष्ठानतर्फे त्यांना ‘कानुश्री रत्न’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. त्यांनी जगभर केलेल्या भ्रमंतीवर आधारित ‘जिप्सी लैला’ हे पुस्तक लिहिले हाते. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या त्या पहिल्या पीएच.डी.धारक होत्या.
कुशाग्र बुद्धीमत्ता, तसेच प्रत्येक विषयाचे आत्मचिंतन करून त्यावर आपले परखड मत व्यक्त करणाऱ्या त्या विदुषी होत्या. त्यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्राची मोठी हानी झालेली आहे. त्यांच्यावर बुधवारीच अंत्यसंस्कार करण्यात आले.त्या धुळ्यात एकट्याच वास्तव्यास होत्या. त्यांना मुलबाळ नव्हते.