‘जिव्हाळा’ महिला नागरिक संघातर्फे ज्येष्ठांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:01 PM2019-12-20T22:01:35+5:302019-12-20T22:01:51+5:30

आमदारांकडून मदतीचे आश्वासन : संघातर्फे जनजागृती कार्यक्रम

 Veteran's felicitation by 'Jivala' Women Citizens Association | ‘जिव्हाळा’ महिला नागरिक संघातर्फे ज्येष्ठांचा सत्कार

Dhule

Next


पिंपळनेर : येथे जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे प्रथम वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार मंजुळा गावीत होत्या. तर अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या सहसचिव डॉ.सुलभा कुवर उपस्थित होत्या.
शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष संरक्षण कायदा केला असून ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. माझ्यापरीने मी ज्येष्ठांना ज्या-ज्या योजना असतील त्यातून सर्वतोपरी मदत करेल. आमदार निधीतूनही ज्येष्ठ नागरिक संघाला निधी मिळवून देईल, असे आमदार मंजुळा गावीत यांनी पिंपळनेर येथील जिव्हाळा महिला संघातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विचार व्यक्त केले.
तर प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा. ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष प्रा.विश्वासराव भदाणे, फेस्काम खान्देशचे कोषाध्यक्ष वासुदेव भदाणे, सहसचिव डॉ.रमाकांत शिरोडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ.जितेश चौरे, डॉ.योगिता चौरे, डॉ.शुभांगी कोतकर, डॉ.डी.के. दळवेलकर, वाणी समाज अध्यक्ष जयवंत बागड, सोमनाथ कोठावदे, पंढरीनाथ कोठावदे, सुभाष जगताप, एस.आर. भदाणे, खारकर व ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा विमलबाई दशपुते उपस्थित होते.
जिव्हाळा महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त वाणी मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांनी प्रथम दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन केले. यावेळी नवनिर्वाचित आमदार मंजुळा गावीत यांचा साडी, चोळी, शालश्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना जिव्हाळा महिला नागरिक संघाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. डॉ.शिरोडे यांनी संघाचे महत्त्व, कायदे यावर माहिती दिली. तर आरोग्यावर डॉ.जितेश चौरे, डॉ.योगिता चौरे, डॉ.दळवेलकर, डॉ. शुभांगी कोतकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी संघातर्फे ज्येष्ठ महिलांचा सत्कार करुन औक्षण सुनांनी केले व भेट दिली. प्रास्ताविक व अहवाल वाचन मालू दशपुते व रत्ना लोखंडे यांनी केले.

Web Title:  Veteran's felicitation by 'Jivala' Women Citizens Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे