Video: धुळ्यात पोलिसांचे मॉक ड्रील सुरू होतं, नागरिकाने 'दहशतवाद्या'ला चोप दिला...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 12:01 PM2023-08-08T12:01:06+5:302023-08-08T12:11:05+5:30
धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात दहशतवादी शिरले असल्याचा फोन पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात आला. यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याचा थरार यावेळी धुळेकरांनी अनुभवला.
अनेकदा पोलीस विविध गोष्टींवर मॉक ड्रील करून तयारींची चाचपणी करत असतात. असेच एक दहशतवादी हल्ल्याचे मॉक ड्रिल पोलिसांच्या चांगलचे अंगलट आले आहे. तो खोटा दहशतवादी एका नागरिकाला ओलीस ठेवून वातावरण निर्मिती करत असताना संतापलेल्या एका नागरिकाने त्याला चांगलाच चोप दिला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात दहशतवादी शिरले असल्याचा फोन पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात आला. यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याचा थरार यावेळी धुळेकरांनी अनुभवला. मात्र हे पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र यावेळी दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्या व्यक्तीलाच एका नागरिकाने चोप दिल्याचा प्रकार घडला. यावेळी चोप देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी लागलीच ताब्यात घेतले.
फोन पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात वाजला नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेला सतर्क केले. काही वेळातच शहरातून सायरन वाजवत पोलिसांची वाहने मंदिराजवळ पोहोचली. मंदिर परिसरात यावेळी एकच धावपळ उडाली. मंदिरात शिरलेल्या दहशतवाद्यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन चौघा भाविकांची सुखरूप सुटका केली. हा सगळा थरार धुळेकर नागरिकांनी काल सायंकाळी अनुभवला. परंतू, या दहशतवादी नाटकामुळे मुले रडत आहेत, नागरिक घाबरले आहेत, या कारणामुळे एका नागरिकाने त्या दहशतवाद्यावरच हात उगारले. दोन-तीन कानशीलातही लगावल्या.
धुळे: पोलिसांची मॉक ड्रील, बिचाऱ्या बंदुकधारी दहशतवाद्याने फुकटचा मार खाल्ला... #Dhule#Police#Terrorist#ViralVideo#SocialViral#Trending#Maharashtrahttps://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/FaGKmqcucX
— Lokmat (@lokmat) August 8, 2023
हा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी स्वामीनारायण मंदिराच्या कॅन्टीन परिसरात नागरिक कुटुंबीय समवेत बसले असताना दहशतवादी आत शिरताच त्यांनी केलेल्या बंदुकीच्या फायरिंग च्या आवाजामुळे काही महिला आणि लहान मुले प्रचंड घाबरली होती, यामुळे या संतप्त झालेल्या नागरिकाने दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्यालाच चोप दिला.
या चोप देणाऱ्या नागरिकाला पोलिसांनी लागलीच ताब्यात घेत हे ट्रेनिंगचा एक भाग असल्याचे सांगत ताब्यात घेतले, असे ऋषिकेश रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी, धुळे यांनी सांगितले.