बोराडी परिसरात विजेच्या समस्येने ग्रामस्थ झाले त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:12 PM2020-01-30T12:12:10+5:302020-01-30T12:12:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर : तालुक्यातील बोराडी परिसरातील सलईपाडा, चिंचपाणी, नवाधाबापाडा, तिखीबर्डी, वाहण्यापाणी, जामनपाणी या दुर्गम आदिवासी भागातील विजेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील बोराडी परिसरातील सलईपाडा, चिंचपाणी, नवाधाबापाडा, तिखीबर्डी, वाहण्यापाणी, जामनपाणी या दुर्गम आदिवासी भागातील विजेच्या समस्यांनी त्रस्त नागरिकांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्यासह बोराडी येथील उपवीज कार्यालयात कैफियत मांडली.
राहुल रंधे यांनी संबंधित अधिकारींना सांगितले की, यापैकी काही गावांमध्ये विजेचे रोहित्र नादुरुस्त आहे तर काही ठिकाणी विजेची अनियमिता व भारनियमन जास्त असल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे खुप हाल होत आहेत. पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने पिके करपून जात आहेत. आधीच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.व आता पाणी नसल्याने पिक हातातून जाण्याची शक्यता आहे.वीज वेळेवर येत नसल्याने पिकांना पाणी मिळत नाही व शेतकरी डोळ्यासमोर पिक जात आहे म्हणून अतिशय त्रस्त झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी फीडर, रोहित्रसंबधीत ताबडतोब उपाययोजना करण्याची सुचना दिली.
यावेळी उपअभियंता नेमाडे, सैंदाणे, शशांक रंधे, भाजपाचे आदिवासी आघाडीचे उपाध्यक्ष भरत पावरा, रामदास गुजर, महेंद्र निकम, मनोज निकम, तुकाराम पावरा, सुतारा पावरा, जगदीश पावरा, विसन पावरा, मावा पावरा, खुमसिंग पावरा,गिरमा पावरा, केरसिंग पावरा, चुनीराम पावरा, प्रधान पावरा, राजल पावरा, नवलसिंग पावरा आदी उपस्थित होते.