गाव मारुतीला पावसासाठी पाण्याने घागर भरुन ‘साकडे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:47 PM2019-07-17T22:47:34+5:302019-07-17T22:47:53+5:30

मालपूर : पेरणी वाया जाणार तर काही ठिकाणी खोळंबा

The village is filled with water for rain as it 'saves' | गाव मारुतीला पावसासाठी पाण्याने घागर भरुन ‘साकडे’

मारुती मंदिरात पाण्याची ‘घागर’ भरुन पाण्यासाठी साकडे.

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील परिसरात थोडाफार का होईना पाऊस झाला. मात्र मालपूर गावातच पाऊस होत नसल्यामुळे येथील ग्रामस्थांनी पाण्याने भरलेली घागर गावाचा मेढ्या समजला जाणारा मारुती समोर ठेवून देवालाच पाण्यासाठी साकडे घातले आहे.
सध्या सर्वत्र पाण्याची आवश्यकता आहे. मात्र काही दिवसांपूर्वी ब्राम्हणे, विखरण आदी परिसरात जोरदार पाऊस झाला होता. मात्र त्याही पावसाने मालपूरसह परिसराला हुलकावणी दिली. आद्रा नक्षत्राच्या तुटपुंज्या पाण्याच्या आधारावर येथील शेतकºयांनी मोठी आशा बाळगून लावणी व पेरणी केली. त्यानंतर पाऊसच झाला नाही. यामुळे हे सर्व बियाणे आता वाया जाणार आहे. काही शेतकºयांच्या पेरण्या देखील वाया जाणार आहे. तर काही शेतकºयांच्या पेरण्या देखील पूर्ण न झाल्यामुळे खोळंबा निर्माण झाला आहे.
आजुबाजूला थोडाफार का असेना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र जुलै महिना संपत आला तरी देखील रानावनात चारा उपलब्ध न झाल्यामुळे जनावणे दावणीला बांधले आहेत व गोठ्यातला चाराही संपण्याच्या मार्गावर असल्यामुळे येथील ग्रामस्थांनी पाण्याची ‘घागर’ भरुन गावाच्या मुख्य मारुती मंदिरातील त्याच्या मूर्ती समोर ठेवून पाण्यासाठी साकडे घातले आहे.

Web Title: The village is filled with water for rain as it 'saves'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे