्नगावाबाहेरुन बस जात असल्याने ग्रामस्थ त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 10:41 PM2019-09-13T22:41:16+5:302019-09-13T22:41:32+5:30
शहरातून बस न सुरू केल्यास आंदोलनाचा इशारा : पुरामुळे वाहतुकीचा बदल अद्यापही कायम
कापडणे : गेल्या महिन्यात संततधार पावसामुळे पांझरेला आलेल्या महापुरामुळे शहरात संपर्क साधणारे मुख्य दोन पुल नादुरुस्त व धोकादायक झाले असल्याने बससेवा अन्य मार्गाने वळविण्यात आली. याचा पविणाम परिसरातील गावातील शेकडो विद्यार्थी व प्रवाशांची खूप दिवसापासून मोठी गैरसोय होत आहे. सदर बससेवा अद्यापही वळविण्यात आलेल्या मार्गानेच जात असल्याने व शहरातून बसेस जात नसल्याने विद्यार्थी व प्रवाशांना नगाव बारी येथे बसेसची रात्री-अपरात्री ताटकळत वाट पहावी लागत असते.
गेल्या महिन्यात पांझरा नदीला तब्बल दोन ते तीन वेळेस महापूर आल्याने देवपूर, दत्तमंदिरमार्गे देवभाने, कापडणे, सोनगीरकडे जाणाऱ्या बसेस शहराबाहेरून बायपास मार्गे धुळे नगावबारीवरून देवभानेकडे जात आहेत. पोलीस विभागाच्या व एसटी महामंडळच्या या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनींची वारंवार गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांची व प्रवाशांची खूप दिवसापासून ससेहोेलपट होत आहे. नगाव, धमाणे, देवभाने, कापडणे, धनुर, लोणकुटे, सरवड, सोनगीर, सायने, नंदाणे, बुरझड, रामी, बेहेड, बोरीस, लामकानी या परिसरातून धुळे शहरात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना येणे जाणे खूपच अडचणीचे झाले आहे.
शहरातून देवपूरमार्गे येणाºया बसेस मधील विद्यार्थी विविध थांब्यांवर थांबून विद्यार्थी शाळा महाविद्यालयात शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र पूल नादुरुस्त व गणेश स्थापनेच्या नावाखाली अद्यापही बसेस शहरातून ये-जा करण्याचे बंद आहे. याबाबत गणेश विसर्जनानंतर बसेस शहरातून ये-जा करण्याचे सुरू न झाल्यास कापडणे, धनुर, लोणकुटे येथील विद्यार्थ्यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.