दिवाळी सणावर पावसाचे ‘विरजण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 01:27 PM2019-10-27T13:27:48+5:302019-10-27T13:28:44+5:30

चैतन्य । लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येस बाजारपेठ फुलली

'Virajan' of rain at Diwali festival | दिवाळी सणावर पावसाचे ‘विरजण’

dhule

Next

धुळे : एैन दिवाळीच्या काळात चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेला पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडतांना विचार करावा लागत आहे़ शनिवारी दिवाळीच्या पूर्वसंध्येला आग्रारोडवर नागरिकांना खरेदीसाठी गर्दी केली होती़ मात्र अचानक जोरदार पावसाने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
दिवाळीनिमित्त आग्रारोडवरील पाचकंदिल ते महात्मा गांधी पुतळा, तसेच नवीन महापालिका ते संतोषी माता मंदिर चौकापर्यंत विविध वस्तू विक्रीचे दुकाने सजली आहेत़ धन त्रयोदशीच्या दिवसापासून बाजारपेठेत खरीददारांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे़ मुख्य रस्त्यावर चालायलाही जागा मिळणे शक्य होत नाही़. पहिल्यांच दिवशी कपडे, सोने-चांदी, वाहन आदींची खरेदी झाल्याने, कोट्यावधींची उलाढाल झाली आहे.
खरेदीसाठी धावपड
रविवारी लक्ष्मी पुजन असल्याने शनिवारी बाजारा मोठी गर्दी झाली होती़ केरसुणीला फारसे स्थान राहिलेले नसले तरी दिवाळीनिमित्त लक्ष्मींची मूर्तीसोबत केरसुनीची पुजा केली जाते़ लक्ष्मी पुजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या मूर्तीसोबत केरसुनीची पुजा केली जात असल्याने केरसुनीची विक्री झाली़ व्यापारी वर्ग दिवाळीच्या सणात व्यवहारातील जमा खर्च नोंदणीसाठी खतावण्यांचा वापर करीत असतात; यामुळे दिवाळी पाडव्या निमित्त खतावण्यांची पूजा व्यापारी वगार्तून करण्यात येते. या खतावण्या विकल्या जात आहेत़
अचानक उडाली धावपड
आठवड्याभरापासून रिमझिम तर कधी जोरदार पाऊस सुरू आहे़ त्यामुळे विक्रेत्यांची धावपळ तर व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे़

Web Title: 'Virajan' of rain at Diwali festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे