संस्कार भारतीतर्फे वसुंधरा दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:36 AM2019-04-23T11:36:30+5:302019-04-23T11:37:32+5:30
संस्कार भारतीतर्फे रांगोळीच्या माध्यमातून वसुंधरा दिवस साजरा़
धुळे : संस्कार भारती महानगरतर्फे वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. शहरातील राणाप्रताप चौक याठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून वसुंधरा दिन साजरा करण्यात आला.
संस्कार भारतीच्या अखिल भारतीय स्तरावर रांगोळीच्या माध्यमातून संदेश द्यावा असे ठरले. एकाच प्रकारची रांगोळी संपूर्ण भारतवर्षात सर्व समित्यांनी साकारुन वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. ही रांगोळी भु-अलंकरण विभागातील नीला रानडे, केदार नाईक, वृषाली येवले, स्मिता मुर्तडक, संपदा साठ्ये यांनी साकारली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदनलाल मिश्रा, पवन पोद्दार, रत्नाकर रानडे, श्रीमती जयश्री शाह, नीला रानडे, केदार नाईक, शरद साठ्ये, वृषाली येवले, अनघा ओक, साधना मानेकर श्रीमती स्मिता मुर्तडक, संपदा साठ्ये, अजय कासोदेकर, वीणा गान, सतिष परदेशी, डॉ़ सविता बहाळकर, हेमंत जोशी यांनी परिश्रम घेतले.
वसुंधरा दिवसाचे उदिष्टे
वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. पृथ्वीचे संरक्षण करण्याची जबाबदारीचे स्मरण करून देण्यासाठी वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीबाबत प्रबोधन करण्यासाठी वसुंधरा दिन साजरा केला जातो़